या मदरसामध्ये शिकवली जाते संस्कृत भाषा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या क्षेत्रातील गोरखपूरच्या दारूल उलूम हुसैनिया मदरसामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकवली जाते. ANI ला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संस्कृत शिकायला आवडतं. आमचे शिक्षक आम्हाला खूप चांगल्याप्रकारे संस्कृत शिकवतात. तसेच आमचे पालक देखील आम्हाला मदत करतात. 

Dakshata Thasale Updated: Apr 10, 2018, 11:46 AM IST
या मदरसामध्ये शिकवली जाते संस्कृत भाषा  title=

गोरखपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या क्षेत्रातील गोरखपूरच्या दारूल उलूम हुसैनिया मदरसामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकवली जाते. ANI ला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संस्कृत शिकायला आवडतं. आमचे शिक्षक आम्हाला खूप चांगल्याप्रकारे संस्कृत शिकवतात. तसेच आमचे पालक देखील आम्हाला मदत करतात. 

मदरसामधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिकतेशी जोडण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. मदरसामध्ये संस्कृतसोबतच इंग्रजी, गणित, अरबी, हिंदी आणि संस्कृत शिकवलं जात आहे.  असं म्हटलं जातं की, उत्तर प्रदेशमध्ये पहिला असा मदरसा आहे जिथे संस्कृत शिकवलं जातं. महत्वाची बाब म्हणजे या मदरसामध्ये संस्कृत शिकवणारे शिक्षक हे मुस्लिम आहेत. 

दारूल उलूम हुसैनिया मदरसाचे प्रिंसिपल ANI शी बोलताना म्हणाले की, आम्हाला असं वाटतं की मदरसामधील मुलं कोणत्याही मुलांच्या मागे राहू नयेत. मदरसाची सुरूवात फक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी झालेला नाही तर समाजातील सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी झालेली आहे.