Salary Slip शी संबधित 9 शब्दांचे अर्थ; जाणून घ्या अत्यंत महत्वाची माहिती

 प्रत्येक सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी सॅलरी स्लिप महत्वाची असते.

Updated: Oct 1, 2021, 01:45 PM IST
Salary Slip शी संबधित 9 शब्दांचे अर्थ; जाणून घ्या अत्यंत महत्वाची माहिती title=

मुंबई : प्रत्येक सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी सॅलरी स्लिप महत्वाची असते. या स्लिपला महत्वाचे कागदपत्र देखील मानले जाते. जर तुम्ही Income Tax फाइल करीत आहात, किंवा बॅंकेतून लोन घेऊ इच्छिता त्यावेळी ही स्लिप महत्वाची असते. तसेच एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्विकारण्याआधीसुद्धा आधीच्या नोकरीची सॅलरी स्लिप महत्वाची ठरते. जाणून घेऊ य़ा सॅलरी स्लिपवरील शब्दांचे अर्थ...

प्रोविडंट फंड (PF)
बेसिक सॅलरीच्या 12 टक्के हिस्सा हा PF अकाउंटमध्ये जमा होतो. पीएफमधून जेवढी रक्कम तुमच्या सॅलरीतून कापली जाते तेवढीच रक्कम कंपनीतर्फेदेखील कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते.

मेडिकल अलाउंस
तुम्हाला मेडिकल अलाउंस कवरच्या स्वरूपात मिळतो. या सुविधेचा वापर तुम्ही तेव्हाच करावा जेव्हा गरज पडेल.  जसे की 21 हजार रुपयांच्या इनकमवर ESICसाठी काही पैसे कापले जातात. कंपनी या पैशाला तेव्हा कापते ज्यावेळी कर्मचारी आरोग्याशी संबधीत अडणीवेळी कवरचा वापर करतो. 

स्पेशल अलाउंस
स्पेशल अलाउंस हा एकप्रकारचा रिवॉर्ड असतो. जो एम्प्लॉईला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येतो.  परंतु वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्याप्रकारची परफॉर्मन्स पॉलिसी असते. हा अलाउंस करपात्र असतो.

टार्गेट वेरिएबल परफॉमन्स बोनस (TVP)
कर्मचाऱ्यांना कामाच्या परफॉमन्सवर व्हेरिएबल पे आणि परफॉमन्स बोनसवर अवलंबून असते. तुमचा परफॉमन्स कंपनीमध्ये काम करण्याच्या आधारावर मंथली, क्वॉटर्ली आणि वार्षिक बोनस या टार्गेट वेरिएबलवर दिले जाते

प्रोफेशनल टॅक्स
कंपनी तुमच्या सॅलरीच्या आधारावर प्रोफेशनल टॅक्सची कपात करते. PT च्या अंतर्गत वर्षात जास्तीत जास्त 2500 रुपये कपात करण्याचा नियम आहे. प्रोफेशन टॅक्स  राज्य सरकारचा कर असतो. तसेच आयकर हा केंद्र सरकारचा कर असतो.े

ट्रॅवल अलाउंस 
कंपनीच्या कामाच्या निमित्ताने प्रवास केल्यास हा अलाउंस कंपनीतर्फे देण्यात येतो. प्रवासासाठी खर्च झालेली रक्कम तुम्हाला कॅन इन हॅंड सॅलरीला जोडून मिळतो.

बेसिक सॅलरी
सॅलरी स्लिपमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बेसिक सॅलरी होय. बेसिक सॅलरीसोबतच इतर अलाउंस निश्चित करण्यात येतात. प्रोव्हिडंट फंड देखील या आधारावर निश्चित करण्यात येतो. 

 हाऊस रेंट अलाउंस
 HRA चा अर्थ म्हणजेच कर्मचाऱ्यांचा राहण्याचा खर्च. हा खर्च बेसिक सॅलरीच्या 50 टक्के असतो.
 
 लीव ट्रव्हल अलाउंस 
 लीव ट्रव्हल अलाउंस टॅक्स फ्री असतो. हा कर्माऱ्यांना ट्रॅव्हलींग साठी मदत करतो.