लग्नात चुकूनही फोटोग्राफरला उपाशी ठेवू नका; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत .

व्हायरल होणाऱ्या मीम्स मागचं सत्य 

Updated: Oct 1, 2021, 01:27 PM IST
लग्नात चुकूनही फोटोग्राफरला उपाशी ठेवू नका; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत . title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत असतात. पण प्रत्येक मीम्स हसत-खेळत चिमटा काढत असतो. प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालत असतं. असाच एक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Hungry photographer deletes all photos right in front of groom after being denied food at wedding) उपाशी फोटोग्राफरला लग्नात जेवायला मनाई केल्यास तो नववधुसमोर सगळे फोटो डिलीट करू शकतो, हे मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मीम्समुळे अनेकांनी फोटोग्राफरला सपोर्ट केला आहे. 

सोशल मीडियावर का व्हायरल होतंय हे मीम्स? 

एका फोटोग्राफरने लग्नात जेवण नाकारल्यानंतर वरासमोरच त्याच्या कॅमेऱ्यातील सर्व फोटो डिलिट केले. त्याने या संपूर्ण प्रकारावर लोकांची प्रतिक्रिया विचारली आहे. "मी खरोखर फोटोग्राफर नाही, मी प्राणी प्रेमी आहे. मी दिवसभर माझ्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कुत्र्यांचे बरेच फोटो काढतो, जर ते चांगले असतील तर ती माझी आवड आहे,'' असे  रेडडिटवर लिहिले.

एका मित्राला त्याच्या लग्नाच्या फोटोचे पैसे वाचवायचे होते. त्याने मला फोटो काढण्यासाठी विनवणी केली. रेडडिटने त्याला सांगितलं की, मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही. पण त्याने मला विनंती केली. 

छायाचित्रकाराने 250 डॉलरमध्ये शूट करण्यास सहमती दर्शविली. त्याने सकाळी 11 च्या सुमारास काम सुरू केले आणि संध्याकाळी 7:30 च्या सुमारास ते संपणार होते. "संध्याकाळी 5 च्या सुमारास, जेवण द्यायला सुरूवात झाली. त्यावेळेस मला खूप भूक लागली. मी माझी भूक आवरू शकलो नाही. पण मला तिथे फोटोग्राफर म्हणून उपस्थित राहणं गरजेचं होतं. त्यांनी जेवणासाठी मला एकही टेबल बूक केला नव्हता. 

पुढे तो म्हणाला,'त्यानंतर मी खूप थकलो. त्यानंतर मी फोटोग्राफर म्हणून काम करत असल्याचा मला पश्चाताप झाला. तसेच लग्नाची जागा खूप गरम ठिकाणी होती. तेथे एसी नव्हता वातावरण अतिशय उष्ण होतं.' त्यामुळे त्याला थोड्या आरामाची गरज होती. 

त्यानंतर त्याने वराला सांगितले की त्याला काहीतरी खाण्यासाठी आणि पिण्यासाठी 20 मिनिटांच्या विश्रांतीची गरज आहे. मात्र तेव्हा वधुने त्याला परवानगी दिली नाही. 'मला फोटोग्राफरची गरज आहे. तू थांब अथवा पैशाशिवाय निघून जा', असे बोल लगावले.

यानंतर फोटोग्राफर म्हणाला की,'गरमीमुळे आणि भुकेमुळे मी खूप थकलो होतो. या सगळ्या परिस्थितीत मी खूप थकलो होतो. मी पुढे तिला विचारलं तुला हरकत नसेल आणि तुझा निर्णय पक्का असेल तर मी फोटो डिलीट करतो.' वधुने देखील त्यावर होकार दिला. मी सगळे फोटो वधुच्या समोर डिलीट केले. यानंतर ते कपल हनीमूनला गेल्यावर त्यांचे नातेाईक आणि मित्र परिवार लग्नाच्या फोटोबद्दल विचारणा करत होते.