अखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी

राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 3, 2017, 06:17 PM IST
अखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी title=

नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.

तेंडुलकर आज(गुरूवारी) सभागृहात प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी लावली. त्यांनी या सत्राचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. 

सचिनसोबत बसली होती मेरी कॉम:

आज ते सभागॄहात आले असताना त्यांच्यासोबत प्रसिद्ध महिला बॉक्सिंग खेळाडू मेरी कॉम सुद्धा बसली होती. पण त्यांच्यात काही बोलणी झाली नाही. तेंडुलकर यांना २७ एप्रिल २०१२ ला वरच्या सभागृहात खासदारकी देण्यात आली होती. या पदाचा कार्यकाळ २६ एप्रिल २०१८ ला संपणार आहे. 

दरम्यान, अनेकदा राज्यसभेच्या अनेक खासदारांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून गोंधळ घातला होता. या दोघांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती.