मनाली : एकेकाळी देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर या दिवशी जयंती. या दिवसाच्या निमित्ताने आज देशवासी या महान नेत्याला अभिवादन करत आहेत. अटलजी आज आपल्यात नसले तरीही त्यांचे विचार आणि सन्मार्गावर चालण्याचा त्यांनी दिलेला कानमंत्र आजही जणूकाही एखाद्या मार्गदर्शकाप्रमामेच आपल्याला वाट दाखवत आहे. अटलजींचं हेच योगदान पाहता त्यांच्या नावे हिमाचल प्रदेश येथे तयार करण्यात आलेल्या रोहतांग बोगद्याचं नामकरण अटल टनल असं केलं जाणार आहे.
वायजपेयी यांच्या जयंतीनिमित्त एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं नामकरण 'अटल टनल' atal tunnel म्हणून करण्याला अधिकृत स्वीकृती दिली गेली.
मनालीपासून सुरु असणारा हा rohtang tunnel बोगदा लेहपर्यंत जाणार आहे. ज्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. आतापर्यंत अटल योजनेचं जवळपास ८० टक्के काम पूर्ण झालं आहे. असंही म्हटलं जातं की, हा जगातील सर्वाच उंच बोगदा ठरणार आहे. २०२०मध्ये मे महिन्यात या बोगद्याचं उदघाटन करण्याचा मानस आहे.
हे असणार या बोगद्याचे फायदे....
रोहतांग टनलमुळे किंवा अटल बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील ४५ किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीसारखा जो भाग देशापासून सहा महिने संपर्कात नसतो तोच भाग आता बाराही महिने संपर्कात राहणं शक्य होणार आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे. ज्याच्या निर्मितीसाठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचा अंदाज आहे.
मुख्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर येत्या काळात हा बोगदा सैन्यदल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे. पीर पंजालचे पर्वत पोखरुन तयार करण्यात येणाऱ्या याच बोगद्याखाली आणखी एका बोगद्याची निर्मिती करण्यात येत आहे. ज्यामाध्यमातून अटीतटीच्या प्रसंगी तो फायद्याचा ठरु शकेल. बीआरओच्या निरिक्षणाअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या बोगद्यासाठी भाररातीलच जाँईंट वेंचर कंपनी एफकॉन यांच्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे.