अपघातानंतर दुचाकीला पाच किलोमीटरपर्यंत फरफट नेले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

रस्ते अपघात आणि हिट अँड रन अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण अशी घटना तुम्ही क्वचितच पाहिले असेल.

Updated: Jun 1, 2022, 07:09 PM IST
अपघातानंतर दुचाकीला पाच किलोमीटरपर्यंत फरफट नेले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात जे आपलं मनोरंजन करतात. त्यामुळे कोणीही सोशल मीडीयावर आलं तर त्याचा तासनतास कसा निघून जाते हे, त्याचं त्यालाच कळत नाही. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सर्वांसाठीच धक्कादायक आहे. एवढेच काय तर हा व्हिडीओ पाहून लोकांच्या अंगावर काटा येत आहे.

रस्ते अपघात आणि हिट अँड रन अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण अशी घटना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. ही अपघाताची घटना रायबरेली येथील आहे.

यामध्ये दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर दुचाकी कारच्या पुढील भागात अडकल्याने चालकाने त्याला पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेचा एक छोटासा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

खरे तर हे प्रकरण उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील नसीराबाद धाना भागातील छटोह येथील आहे. येथे मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरल्यानंतर विश्वेश्वरपूर गावातील रहिवासी देशराज कोरी हे पेट्रोल पंपाबाहेर फोनवर बोलत होते. दरम्यान, सलूनकडून भरधाव वेगात आलेल्या कारने देशराज आणि त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे देशराज यांनी खड्ड्यात उडी मारली परंतु त्यांची दुचाकी मात्र कारच्या पुढील भागात अडकली. धडकेचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांचा आरडा ओरडा सुरु झाला, ज्यामुळे कार चालक घाबरला आणि त्याने आपली गाडी न थांबवता ती, गाडीचा वेग धरला आणि दुचाती गाडी फरफटत नेली.

त्याने जवळ-जवळ 5 किलोमीटर पर्यंत दुचाकी फरफटत नेली.

यादरम्यान रस्त्यावर घासल्यामुळे दुचाकीमधून ठिणग्या येत राहिल्या, मात्र चालकाने गाडी थांबवली नाही. गाडी पाच किमी चालवल्यानंतर त्यांनी थेट नशिराबाद पोलीस ठाण्यात जाऊन गाडी थांबवली.

कारची धडक बसल्याने देशराज खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णवाहिकेच्या मदतीने सीएचसी नशिराबाद येथे दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही घटना मंगळवार 24 नोव्हेंबर रोजी घडली. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन कार चालकावर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.