रॅलीतील गर्दी दाखविण्यासाठी लालूंनी घेतली फोटोशॉपची मदत?

भाजप विरोधात विरोधक एकत्र आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पाटणामध्ये लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या 'बीजेपी भगाओ, देश बचाओ' रॅली, रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीचा एक फोटो लालू प्रसाद यादव यांनी शेअर केला आणि त्यानंतर त्यांची गोची झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 27, 2017, 05:46 PM IST
रॅलीतील गर्दी दाखविण्यासाठी लालूंनी घेतली फोटोशॉपची मदत? title=
Image from Twitter

पाटणा : भाजप विरोधात विरोधक एकत्र आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पाटणामध्ये लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या 'बीजेपी भगाओ, देश बचाओ' रॅली, रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीचा एक फोटो लालू प्रसाद यादव यांनी शेअर केला आणि त्यानंतर त्यांची गोची झाली आहे.

‘भाजप भगाओ, देश बचाओ’ या रॅलीला विरोधकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच समर्थकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवर रॅलीचा एक फोटो शेअर केला आणि मग सर्वच समोर आलं.

आपली रॅली किती यशस्वी झाली हे दाखविण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी गर्दीचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यांनी दावा केला की, गांधी मैदानात २५ लाखांहून अधिक लोक उपस्थित आहेत. तसेच ७५ टक्के लोक अद्यापही रस्त्यावर आहेत असे म्हणत त्यांनी गर्दीचा फोटो शेअर केला.

मात्र, फोटो नीट पाहीला असता स्पष्ट दिसत आहे की, फोटो एडिट केलेला आहे. मैदानात फोटोशॉपच्या माध्यमातून गर्दी दाखविण्यात आली आहे.

 

एएनआयनेही त्यानंतर ट्विटरवर फोटो शेअर केला. लालू यादव यांनी ज्या ठिकाणावरुन काढलेला फोटो ट्विटरवर शेअर केला. एएनआयने शेअर केलेल्या फोटोत स्पष्ट दिसत आहे की, लालूंनी शेअर केलेल्या फोटोच्या तुलनेने गर्दी कमी दिसत आहे.
या सर्व प्रकारामुळे लालू प्रसाद यादव यांची चांगलीच गोची झाल्याचं दिसत आहे.