How To Store Milk: दैनंदिन जीवनात आपण विद्युत उपकरणांवर किती अवलंबून असतो याचा विचार केला की या वस्तूंच भलीमोठी यादीच डोळ्यांपुढे उभी राहते. अगदी लहानसहाम कामांपासून घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत सगळीकडे या न त्या रुपात या उपकरणांची गर्दी असते. त्यातलंच एक अतिशय फायद्याचं आणि मोठ्या मदतीचं साधन म्हणजे फ्रिज अर्थात refrigerator.
खाद्यपदार्थाशी संबंधित कोणतीही गोष्ट ताजी ठेवण्यासाठी, किडे- किटकांपासून वाचवण्यासाठी सहसा आपण ती फ्रिजमध्ये ठेवतो. दूध हे त्यापैकीच एक. तुम्हीआम्ही लहानपणापासून पाहत आलो असू, की दुधाची पिशवी, बाटली किंवा टेट्रापॅक थेट फ्रिजमध्येच ठेवलं जातं. दूध तापवलेलं असो किंवा नसो ते चांगलं रहावं यासाठी फ्रिजमध्ये ठेवण्याचा अनेकांचं प्राधान्य असतं. तुम्हाला माहितीये का फ्रिजमध्ये ठेवूनही दूध खराब होतं.
किंबहुना फ्रिजमध्ये नेहमीच दूध खराब होतं असं सांगणारेही अनेकजण तुम्ही पाहिले असतील. पण, असं का होतं याचा विचार कधी केला आहे का? फ्रिज घेताना आपण पाढा गिरवावा तसा इतर मंडळींनी त्याचा जसा वापर केला त्याचच अनुकरण करतो. अमुक एका जागी तमुक एक पदार्थ ठेवतो, नकळतच चुका करतो. पण, मुळात इथंही एक Theory आहे माहितीये का?
युकेतील होम एप्लाइंसेस इंश्योरेंस एक्सपर्ट कंपनीच्या प्रमुथ पदावर असणआऱ्या क्रिस बेस्ली यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यांच्या माहितीनुसार सहसा फ्रिजच्या दरवाजामध्ये दूध ठेवणं या चुकीचा निर्णय ठरतो.
कोणत्याही फ्रिजच्या दरवाजामध्ये असणारे खण हे इतर खणांच्या तुलनेत उष्ण असतात. त्यामुळं चुकूनही फ्रिजच्या दरवाजावर दूध ठेवू नये. इथं ते नासण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळं ही चूक अजिबातच करु नका.
फ्रिजमध्ये दूध चुकीच्या जागी ठेवणं या एकाच कारणामुळं ते खराब होतं असं नाही. तर, अनेकदा फ्रिजची क्षमता नसतानाही त्यामध्ये अधिकाधिक वस्तू ठेवल्या जातात त्यामुळं दूध नासण्याची शक्यत असते. क्षमतेहून जास्त वस्तू ठेवल्यास फ्रिजमधील गॅस आणि ऑक्सिजन कमी होतं. परिणामी फ्रिजमधी थंड हवा अपेक्षित गोष्टींपर्यंत पोहोचत नाही आणि त्या खराब होण्यास सुरुवात होते.