Home Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार !

Home Loan EMI  : महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan EMI increase) 

Updated: Mar 1, 2023, 08:45 AM IST
Home Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार ! title=

Housing loan EMI increase again? : एकीकडे उन्हाचे चटके बसतायत तर दुसरीकडे महागाईचेही (Inflation) चटके बसणार आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईनं झटका दिला आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan  EMI increase) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. (RBI Repo Rate) त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता महागण्याची अधिक शक्यता आहे. (Home Loan EMI) गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महागाईचा अधिक भडका उडाला आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आता घराचा हप्ता वाढीचा संकेत मिळत असल्याने नोकरदारांच्या खिशावर मोठा भार पडण्याची शक्यता आहे.

महागाईचा भडका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

फेब्रुवारी महिन्यात नोंदवण्यात आलेल्या विक्रमी तापमानाचा विपरीत परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होईल अशी भीती रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काहीशी नियंत्रणात आलेली महागाई विशेषतः कमी झालेल्या अन्नधान्याच्या किमती एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा वाढू लागतील असे चित्र निर्माण झालं आहे. 

महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी...

महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता महागेल. यामुळे घर घेणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्जाचा हप्ता हा महागणार आहे. त्याचवेळी घरखरेदीचे निर्णय केवळ गृहकर्ज दरांव्यतिरिक्त इतर अनेक घटकांद्वारे चालवले जातात आणि निर्धारित केले जातात म्हणून या निर्णयाचा रिअल इस्टेटच्या मागणीवर मर्यादित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जदारांना सध्याच्या गृहकर्जाच्या ईएमआयच्या रुपात दरांमध्ये ही वाढ जाणवेल आणि नवीन कर्जे महाग होण्याचे संकेत मिळत आहेत. 

महागाई रोखण्यात अपयश

गेतवर्षी मे महिन्यापासून, रिझव्‍‌र्ह बँकेने चलनवाढ रोखण्यासाठी अल्प-मुदतीच्या कर्ज दरात 25  बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. मुख्यतः बाह्य घटकांमुळे, विशेषतः रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकानंतर जागतिक पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. किरकोळ महागाई 2 टक्क्यांच्या फरकाने 4 टक्क्यांवर राहील अशी शक्यता होती. तसे आरबीआयला सांगण्यात आले होते. तथापि, जानेवारी 2022 पासून लागोपाठ तीन तिमाहींमध्ये चलनवाढीचा दर सहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात अपयश आले. त्यामुळे रेपोदरात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.