पाहा कशी आहे नीता अंबानी यांच्या बहिणीची Lifestyle

सर्व प्रसिद्धीपासून दूर राहण्यास पसंती देतात.   

Updated: Nov 11, 2021, 03:49 PM IST
पाहा कशी आहे नीता अंबानी यांच्या बहिणीची Lifestyle  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या नावांचा ज्या यादीत समावेश होतो त्याच यादीमध्ये रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याही नावाचा समावेश केला जातो. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या राहणीमानाचा सर्वांनाच अंदाज आहे. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, त्यांच्या कुटुंबात काही अशा व्यक्तीही आहेत ज्या सततच्या चर्चा आणि माध्यमांपासून, या सर्व प्रसिद्धीपासून दूर राहण्यास पसंती देतात. 

अशा व्यक्तींच्या यादीत नीता अंबानी यांच्या बहिणीच्या नावाचाही समावेश आहे. नीता अंबानी लग्नापूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत राहत होत्या. सध्या त्यांचं कुटुंब सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. 

नीता अंबानी यांना एक लहान बहीणही आहे. त्यांच्याहून ती चार वर्षे लहान आहे. ममता दलाल असं त्यांच्या बहिणीचं नाव आहे. एकिकडे नीता अंबानी उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील एक मोठं नाव असतानाच त्यांची बहीण मात्र शिक्षण क्षेत्राशी जोडली गेली आहे. 

धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये ममता दलाल प्राथमिक विभागात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेच्या व्यवस्थापकिय मंडळाचंही काम पाहतात. 

नीता अंबानीही बहिणीप्रमाणेच या क्षेत्राशी जोडल्या गेल्या होत्या. ममता दलाल यांनी आतापर्यंत अनेक स्टारकिड्सना शिकवलं आहे. सततच्या प्रसिद्धीपासून दूर राहण्यालाच त्या कायम पसंती देताना दिसतात. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांमध्ये मात्र त्यांची आवर्जून उपस्थिती पाहायला मिळते.