Mukesh Ambani relaince : मुकेश अंबानी यांच्याकडून सातत्यानं त्यांच्या रिलायन्स उद्योग समुहाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यावर भर दिला जातो. काळ जसजसा पुढे येतो तसतसं अंबानीसुद्धा त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देताना दिसतात. यामध्ये त्यांना साथ मिळतेय ती म्हणजे पुढच्या पिढीची, अर्थात तिन्ही मुलांची. रिलायन्स उद्योग समुहाच्या (Reliance AGM) वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीही मुकेश अंबानी बरेच सक्रिय दिसले. त्यांनी कंपनीसाठी काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची बरसात केली.
ईशा अंबानींच्या रिलायन्स रिटेलकडून (Isha Ambani Relaince Retail) मागील आर्थिक वर्षाच्या अनुषंगानं जवळपास 15 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 351 कोटी अर्थात तब्बल 3,51,00,00,000 रुपयांचे इसॉप्स देण्यात आले आहेत. कंपनीनं या अधिकाऱ्यांना 796.5 रुपये प्रति शेअर या दरानं 10 रुपयांचे 4.417 मिलियन शेअर दिले. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आली.
मुकेश अंबानी आणि रिलायन्स उद्योग समुहाकडून ज्या कर्मचाऱ्यांना इसॉप्स देण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये संचालक वी सुब्रमण्यम, ग्रॉसरी रिटेलचे दामोदर मल्ल, फॅशन बिझनेस अध्यक्ष अखिलेश प्रसाद, इलेक्ट्रॉनिक्स रिटेलचे अध्यक्ष कौशल नेवरेकर, ऑपरेशन्स चीफ अश्विन खासगीवाला, फॅशन ई कॉमर्स प्लॅटफॉर्न अजिओचे चीफ एक्झेक्युटीव्ह विनीत नायर, जिओमार्टचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर कामदेव मोहंती, जिओ मार्टचे स्ट्रॅटर्जी चीफ प्रतीक माथुर, ट्रेंड्सचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर विपिन त्यागी आणि एफएमसीजीचे ऑपरेटींग ऑफिसर केतन मोदी यांचा समावेश आहे.
गेल्या काही काळापासून रिलायन्स रिटेलची कामगिरी अधिक प्रभावी होत असून, रिटेल क्षेत्रामध्ये आता हा उद्योग समूह आपले पाय भक्कमपणे रोवून उभं असल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच रिलायन्स रिटेलची लिस्टींगही होणार आहे. दरम्यान, अद्याप त्याबबातची कोणतीही, अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. पण, येत्या दोन वर्षांमध्ये कंपनी रिटेल व्यवसायाला शेअर बाजारात लिस्ट करण्यात पुढाकार घेऊ शकते.