काका गेल्यानंतर काकूलाच त्यानं बायको केलं, पण त्याला ही बायको 'पचली' नाही कारण...

नवऱ्याच्या मृत्यूनंतर या महिलेनं आणि तिच्या पुतण्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Updated: Mar 9, 2022, 05:49 PM IST
काका गेल्यानंतर काकूलाच त्यानं बायको केलं, पण त्याला ही बायको 'पचली' नाही कारण... title=

मुंबई : लग्न ही प्रत्येक नवराबायकोसाठी खुप महत्वाची गोष्ट असते. कारण यानंतर त्यांचं आयुष्य संपूर्ण बदलतं. परंतु उदपूरमधून एक असं प्रकरण समोर आलंय, ज्यामध्ये या लोकांनी नात्याचा खेळ करुन टाकला. येथे एका तरुणाने आपल्याच काकांच्या मृत्यूनंतर आपल्या काकीसोबत संसार थाटला. परंतु नंतर त्याने आपल्या काकीची म्हणजेच आपल्या बायकोची देखील हत्या केली आणि तेथून पळ काढला. ज्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. उदयपूरच्या वल्लभनगर येथील राहाणाऱ्या या महिलेचे आपल्या पुतण्यासोबत सबंध होते. त्यामुळे नवऱ्याच्या मृत्यूनंतर या महिलेनं आणि तिच्या पुतण्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणाचा खुलासा करताना पोलीस अधिकारी प्रवीण सिंह सिसोदिया यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन हद्दीतील राणी डुंगला गावात राहणारे भुरा लाल रावत आणि त्यांची पत्नी (काकी) कैलाशी देवी यांच्यात स्वयंपाकाच्या कारणावरून भांडण झाले होते.

याचा राग येऊन भुरालालने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. ज्यात त्याच्या बायकोचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आवश्यक कारवाई करत आरोपी नवऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खेरोडा आणि भिंदर पोलीस ठाण्याचे विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींना पकडण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. 

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकांनी छापेमारी केली. यादरम्यान भुरालाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंगला जंगलात आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. यावर पोलिसांच्या विशेष पथकाने घटनास्थळ गाठून जंगलात छापा टाकून भुरा लाल याला अटक केली. अटक आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.

भुरा लालच्या नात्याने कैलाशी देवी यांचा पुतण्या असल्याचं समोर आलं, पण दोन वर्षांपूर्वी तिचा काका नानालालचा आजाराने मृत्यू झाला. 1 वर्षानंतर दोघांनी लग्न केलं आणि तेव्हापासून ते दोघे एकत्र राहत होते.