मुंबई : आजच्या काळात मुलगा आणि मुलगी लग्नाआधी एकमेकांना खूप वेळ देतात जेणेकरून त्यांना एकमेकांना समजून घेता येईल. लग्नाआधी जर एखाद्याच्या आवडी-निवडी, चांगल्या आणि वाईट सवयी, विचार इत्यादी गोष्टी समजून घेतल्या तर लग्नानंतरचं वैवाहिक जीवन खूप चांगले जाते. तुम्ही कोणावर किती प्रेम करता याने काही फरक पडत नाही. डेटिंग आणि एकत्र राहणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नासाठी अनेक गोष्टी आणि त्यांची समज असणे आवश्यक असते. प्रत्येक मुलगी आपले नातं चालविण्यासाठी टिप्स घेते आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्याकडून वैवाहिक जीवन कसे सांभाळायचे हे शिकते. जर एखाद्या मुलीचे लग्न होणार असेल तर तिने खाली दिलेल्या रिलेशनशिप टिप्सची काळजी घ्यावी, ज्यामुळे लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनात खूप मदत होईल.
1. होणाऱ्या नवऱ्याशी बोला
जर मुलीला काही समस्या असेल तर तिने मनात ठेवण्याऐवजी त्याबद्दल तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलावे. सर्वकाही पूर्णपणे स्पष्ट करणे चांगली गोष्ट आहे. तुमच्या मनात कोणतीच शंका नसली पाहिजे आणि त्याबद्दल बोललात नाही तर लग्नानंतरही तुमच्या रिलेशनमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न करा की तुमच्या मनात कोणत्याच गोष्टी राहणार नाही.
2. मुलांबरोबरच नवऱ्यालाही
लग्नानंतर मुलं झाल्यावर मुलीचे लक्ष आपल्या मुलांकडे जास्त असते असे अनेक नात्यांमध्ये दिसून येतं. पण हेल्दी रिलेशनशिपसाठी दोघांनाही समान महत्त्व देणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मुलं झाल्यावरही नवऱ्याला तसंच महत्त्व द्या, जे लग्नापूर्वी देत होतात. मुलं जे पाहतात तेच करतात, पुढे जाऊन ते देखील असचं करतील. यासाठी मूल आणि पती यांच्यात समतोल ठेवा.
3. हरणं आणि जिंकणं मनात नका ठेवू
लग्नानंतर जोडप्यांमध्ये भांडणं आणि रागावणं सामान्य आहे. पण कोणत्याही गोष्टीचा इतका विचार करु नका ज्यामुळे मतभेद निर्माण झाले तर नात्यातील आंबटपणा वाढतो. त्यामुळे जिंकणं आणि हरणं या भावनेपासून नेहमी दूर राहा आणि कोणतेही भांडण ताबडतोब संपवा.
4. लग्नानंतरही डेटवर जा
वेळेअभावी जोडप्यांना आउटिंग किंवा डिनरला जाता येत नसल्याचे अनेकदा दिसून येते. असे केल्याने त्यांच्या लव्ह-लाइफमधील प्रेम कमी होऊ शकते, म्हणून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पतीसोबत डेटवर जा. शक्य असल्यास नवऱ्याच्या आवडीचे जेवण वेळोवेळी बनवा.
5. प्रत्येक पहाट ही नवीन पहाट असल्याचे वाटायला हवे
गुड मॉर्निंग, गुड नाईट असे शब्द लग्नानंतरही तुमच्या नात्यात प्रेमाची गोडी भरतात. कदाचित काल रात्री तुम्हा दोघांचे भांडण झाले असेल आणि जर तुम्ही स्वतः सकाळी उठल्याबरोबर नवऱ्याला गुड मॉर्निंग म्हणालात तर समोरच्याचा राग नक्कीच संपेल. ऑफिसला जाताना मिठी मारणे इत्यादी गोष्टींमुळे नात्यात सकारात्मकता येते.
6. एकमेकांना स्पेस द्या
कोणत्याही नात्यात एकमेकांना स्पेस देणं महत्त्वाचं असतं. जर तुमचा नवरा कुठेतरी काम करत असेल आणि तुम्ही त्याला मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत बाहेर जाण्यासाठी स्पेस दिली नाही तर त्याला गुदमरायला सुरुवात होईल. त्यामुळे नेहमी एकमेकांना स्पेस द्या
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)