OMG! तरुणीचा साडीतील हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवितोय

Somersault in Saree Video : देसी गर्लची कमाल, साडी नेसून तरुणाने केलेलं स्टंट पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 6, 2023, 05:19 PM IST
OMG! तरुणीचा साडीतील हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवितोय title=
red saree Girl Somersault Stunt video viral on Internet trending now

Somersault in Saree Video : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला व्हिडीओ पोस्ट होत असतात. त्यातील काहीच व्हिडीओ व्हायरल होता आणि ते ट्रेंडिंग होतात. सोशल मीडियावर मनोरंजन व्हिडीओसोबतच भीतीदायक, धोकादायक आणि स्टंट करणारे अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यात लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. तरुणींचे डान्स व्हिडीओलाही मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आहेत. सध्या सोशल मीडियावर लाल रंगाची साडी नेसलेल्या तरुणीचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकव आहेत. (red saree Girl Somersault Stunt video viral on Internet trending now)

साडी नेसून तिने...

साडी नेसल्यावर आजकालच्या तरुणींना नीट चालता देखील येतं नाही. साडी सांभाळणे हे आजच्या तरुणींसाठी सगळ्यात मोठ संकट वाटतं. अनेक तरुणींना तर लग्न झाल्यानंतरही साडी नेसता येतं नाही. पूर्वीच्या बाया या साडी नेसून अख्खा अख्या दिवस घराचा गराडा सांभाळायचा. पण आज साडी नेसणं हे फक्त लग्न समारंभ किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमापूर्ती मर्यादीत राहिलं आहे. 

अशातच एका तरुणीचा लाल साडीतील व्हिडीओ नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे. लाल साडी नेसून या तरुणीने जी काही कमाल केली आहे ते पाहून प्रत्येक जण अवाक् झाला आहे. देसी अवतारातील तरुणाचा साडीमधील स्टंट सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या तरुणीची लवचिकता आणि फिटनेस पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओ नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडतोय. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर मिशा शर्मा या यूजरने पोस्ट केला आहे.