श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये काल दिवसभरात सहा ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. त्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
यात चार ठिकाणी ग्रेनेड हल्ले करण्यात आले तर एका ठिकाणी निवृत्त न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकांकडून शस्त्र हिसकावण्यात आलं... तर पाजलपोरा इथं राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर गोळीबार करण्यात आला.
पुलवामा जिल्ह्यात त्राल येथील सीआरपीएफच्या कॅम्पवर पहिला हल्ला करण्यात आला... या हल्ल्यात नऊ सैनिक जखमी झालेत... दुसरा हल्ला पुलवामातील पडगामपोरा इथं झाला. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही... तर तिसरा हल्ला पुलवामातील पोलीस ठाण्यावर झालाय.
पुलवामा व्यतिरिक्त एक हल्ला पहलगाममधील सरनाल येथे झाला. अनंतनाग जिल्ह्यात हायकोर्टाच्या निवृत्त न्यायधीशांवर हल्ला झाला. यात न्यायाधीशांच्या दोन सुरक्षा रक्षकांकडील शस्त्रेही अतिरेक्यांनी हिसकावून घेतली. या घटनांनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी केले आहे.