कोण पितो ही चहा? 99999 रुपयात विकली गेली १ किलो चहा पावडर, बनवला नवा रेकॉर्ड

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. चहामधील (Tea) प्रमुख आणि महत्त्वाचा घटक म्हणजे चहा पावडर.

Updated: Dec 14, 2021, 07:19 PM IST
कोण पितो ही चहा? 99999 रुपयात विकली गेली १ किलो चहा पावडर, बनवला नवा रेकॉर्ड title=

मुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. चहामधील प्रमुख आणि महत्त्वाचा घटक म्हणजे चहा पावडर. ही चहा पावडर जो जो आपल्या आर्थिक क्षमेतेनुसार घेतो. मात्र एका ठिकाणी एक किलो चहा पावडर जवळपास 1 लाख रुपयांच्या किंमतीने विकली जात आहे. तुम्ही म्हणाल, या चहा पावडरला सोनं लागलंय का. या चहा पावडरला सोनं लागलं नसलं तरी या चहा पावडरच्या नावात गोल्ड नक्कीच आहे. (record break price of assam manohari gold tea sold at 99 thousand 99 rupees per kilo) 

गुवाहाटीतील जीएटीसी केंद्रात मंगळवारी एक किलो गोल्डन बटरफ्लाय चहाला (Golden Butterfly Tea) तब्बल 99 हजार 999 रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. या चहाचे ब्रँडिंग 'मनोहरी गोल्ड' नावाने (Manohari Gold Tea) केलं जातं.
    
मनोहरी गोल्ड टीने मंगळवारी गुवाहाटी टी ऑक्शनमध्ये स्वत:चाच विक्रम मोडित काढला. गेल्या वर्षी या चहाला एक किलोमागे  75 हजार रुपये इतका दर मिळाला होता.

गुवाहाटीतील थोक व्यापारी सौरभ टी ट्रेडर्सने  सोन्यापेक्षा महाग असलेल्या या चहाची खरेदी केली.  सौरभ टी ट्रेडर्सकडून या एक किलो चहा पावडरसाठी 99 हजार 999 रुपयांची विक्रमी बोली लावण्यात आली. 
 
या चहाचं उत्पादन कुठे होतं?

या मनोहारी गोल्ड चहाचं उत्पादन हे डिब्रूगड जिल्ह्यात घेतलं जातं. जीएटीसीनुसार ही सर्वात महागडी चहा पावडर आहे. 

"मनोहारी गोल्ड चहाला  लिलावात प्रति किलोमागे 99 हजार 99 रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच ही चहा अगदी दुर्मिळ आहे", अशी माहिती गुवाहाटी टी ऑक्शन बायर्स असोसिएशनेचे सचिव दिनेश बिहानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
अधिक मागणी मात्र उत्पादन कमी

या चहासाठी लोकांकडून भरुभरुन मागणी केली जात आहे. मात्र या चहाचं उत्पादन फारच कमी घेतलं जातं", अशी माहिती  सौरभ टी ट्रेडर्सचे सीईओ एमएल माहेश्वरी यांनी दिली. 

मनोहारी टी एस्टेट द्वारे या वर्षी केवळ एक किलो चहाचं लिलाव करण्यात आलं आहे.

"ही चहा खरेदी करण्यासाठी आम्ही मोठ्या काळापासून प्रयत्न करत होतो. चहाच्या मळ्याचे मालकांनी ही चहा आम्हाला परस्पर विकण्यास नकार दिला. ज्यानंतर आम्ही ही चहा लिलावात खरेदी करण्यात यशस्वी ठरलो", असं एमएल माहेश्वरी म्हणाले.