भाऊ भावाच्या मदतीला, जिओने विकत घेतले RCom चे वायरलेस अ‍ॅसेट्स

रिलायन्स कम्युनिकेशन(RCom) ४५ हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी रिलायन्स जिओला आपले वायरलेस अ‍ॅसेटस विकणार आहे.

Updated: Dec 28, 2017, 10:42 PM IST
भाऊ भावाच्या मदतीला, जिओने विकत घेतले RCom चे वायरलेस अ‍ॅसेट्स title=

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशन(RCom) ४५ हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्यासाठी रिलायन्स जिओला आपले वायरलेस अ‍ॅसेटस विकणार आहे.

दोन्ही कंपन्यांमध्ये डील झाली आहे. पण हे अजून हे स्पष्ट नाही की, या व्यवहाराच्या बदल्यात जिओ किती पैसे देणार. जाणकार ही २५ हजार कोटींची डील असल्याचे सांगत आहेत. अनिल अंबानीच्या या कंपनीच्या अ‍ॅसेट्ससाठी जिओने मोठी बोली लावली होती. 

RCom कडून स्पष्टीकरण

RCom कडून सांगण्यात आलं आहे की, ‘वायरलेस स्पेक्ट्रम, टॉवर, फायबर आणि मीडिया कन्व्हर्जेंस नोड अ‍ॅसेट्सच्या विक्रीसाठी रिलायन्स जिओसोबत करार करण्यात आलाय.

RCom चे हे अ‍ॅसेट्स टेकओव्हर करेल जिओ

800/900/1800/2100 मेगाहर्ट्स बॅंडमध्ये १२२.४ मेगाहर्ट्स ४जी स्पेक्ट्रम.

- टॉवर बिझनेस - कंपनीकडे ४३ हजार टॉवर आहे. ही कंपनी देशातील टॉप ३ इंडिपेंडेंट टॉवर होल्डींगमध्ये आहे. 

Jio ने लावली होती सर्वात मोठी बोली

RCom नुसार, कंपनीचे अ‍ॅसेट्सच्या व्हॅल्यूएशनसाठी एक कमिटी बनवली गेली होती. त्यानुसार बोली मागवली गेली. सर्वात ऊंच बोली रिलायन्स जिओने लावली. ही प्रोसेस मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. 

 RCom वर किती कर्ज?

RCom वर ४५ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. अनिल अंबानी नुकतेच म्हणाले होते की, रिलायन्स कम्युनिकेशन मार्च २०१८ पर्यंत आपलं २५ हजार कोटींचं कर्ज कमी करेल. यासाठी कंपनीने स्पेक्ट्रम, टॉवर आणि रिअल इस्टेट अ‍ॅसेट्स विकण्याचा निर्णय घेतलाय.