RBI कडून 1 ऑक्टोबरपासून Banking क्षेत्रात मोठा बदल... तुमच्या पैशांवर होणार थेट परिणाम?

गेल्या काही दिवसांपासून  Credit Card आणि Debit Card द्वारे फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. 

Updated: Aug 25, 2022, 10:28 PM IST
RBI कडून 1 ऑक्टोबरपासून Banking क्षेत्रात मोठा बदल... तुमच्या पैशांवर होणार थेट परिणाम? title=

RBI ON Tokenization : 1 ऑक्टोबरपासून बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यासाठी RBI ने आदेशही जारी केला आहे. Credit Card आणि Debit Card वापरकर्त्यांसाठी RBI 1 ऑक्टोबरपासून Card on File Tokenization (CoF Card Tokenization) नियम आणणार आहे. 

त्यामुळे तुमचे Credit Card आणि Debit Card टोकनाईझ (Tokenize) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. याचा अपडेट RBI ने 24 जूनदरम्यान दिला होता. 

RBI ने दिलेल्या माहितीनुसार या नवीन नियमांचा उद्देश Credit आणि Debit Card द्वारे पेमेंट पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करणे हा आहे. गेल्या काही दिवसांपासून  Credit Card आणि Debit Card द्वारे फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर जर ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार, Point of Sell किंवा Credit Card आणि Debit Card ने payment अॅपद्वारे केले तर सर्व तपशील एनक्रिप्टेड (Encrypted code) कोडमध्ये जतन केले जातील.

ही टोकनायझेशन प्रणाली काय आहे? हे जाणून घ्या

टोकन प्रणाली सर्व Credit Card आणि Debit Card डेटा 'टोकन्स' मध्ये रूपांतरित करते. कोणतीही व्यक्ती बँकेला विनंती करून कार्ड टोकनमध्ये बदलू शकते. यासाठी कार्डधारकाला कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तुम्ही तुमचे कार्ड टोकनमध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणत्याही शॉपिंग वेबसाइट किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर जाऊन करून घेऊ शकता.  

फसवणुकीच्या घटना कमी होतील?

रिझव्‍‌र्ह बँकेचे म्हणणे आहे की नवीन नियम लागू झाल्याने फसवणुकीच्या घटना कमी होतील. ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती लीक झाल्यामुळे त्यांच्यासोबत फसवणूक होण्याचा धोका वाढतो. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की सध्या ई-कॉमर्स वेबसाइट्स, व्यापारी स्टोअर्स आणि अॅप्स इ. ग्राहकांनी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यानंतर कार्ड तपशील संग्रहित करतात. अनेकदा व्यापाऱ्यांकडे कार्ड तपशील ग्राहकांसमोर ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. हे तपशील लीक झाल्यास ग्राहकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र नवीन नियम लागू झाल्यावर अशा घटनांना आळा बसेल.  

कसं करून घ्याल कार्ड टोकनाईझ? 

- कोणत्याही ई-कॉमर्स मर्चंट वेबसाइट किंवा अॅप्लिकेशनवर जा आणि ट्रान्सझॅक्शन सुरू करा 
- चेकआउट करताना कार्ड पेमेंट पर्याय निवडा आणि CVV तपशील प्रविष्ट करा.
- नंतर “Secure Your Card” किंवा “Save card as per RBI Guideline Principals” वर क्लिक करा. 
- त्यानंतर Save वर क्लिक करा आणि OTP टाका.