अनेक बँकांमध्ये खाते असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चे नियम पाळा नाहीतर...

एकापेक्षा जास्त अकाउंट्स वापरात असाल तर अशी काळजी घ्या...

Updated: Oct 7, 2022, 06:35 PM IST
अनेक बँकांमध्ये खाते असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चे नियम पाळा नाहीतर... title=

Multiple Bank Accounts: वेगवेगळ्या बँकांमध्ये अनेकांचे अकाउंट्स असतात. एकापेक्षा अधिक अकाउंट्स वापरताना तुम्ही वेळीच सावध नाही झाला तर तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागेल. तुम्हीही एकापेक्षा जास्त अकाउंट्स वापरात असाल तर अशी काळजी घ्या...

आरबीआयची (RBI) कोणतीही मर्यादा नाही

अनेक बँकांमध्ये अकाउंट उघडण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. ग्राहक 2, 4 किंवा 5 कितीही अकाउंट्स उघडू शकतो. आरबीआयने यासंदर्भात कोणतीही मर्यादा जारी केलेली नाही.

अनेक अकाउंट्स असण्याने अनेक अडचणी येतात

जर तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणजे एकापेक्षा जास्त खाती ठेवलीत तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, पण सामान्य व्यक्तीसाठी हे खूप कठीण आहे. बँक अकाउंटसोबतच तुम्हाला त्याची किमान शिल्लक राखावी लागेल. याशिवाय, तुम्हाला इतर अनेक प्रकारच्या सुविधांच व्यवस्थापन करावं लागेल.

अनेक प्रकारची फी भरावी लागू शकते...

जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर तुम्हाला मेंटेनन्स चार्जेस, क्रेडिट आणि डेबिट कार्ड चार्जेस, सर्व्हिस चार्जेससह अनेक फी भरावी लागेल. त्यामुळे जर तुम्ही एकाच बँकेत अकाउंट ठेवलं तर तुम्हाला एकाच बँकेची फी भरावी लागेल.

अनेक वेळा दंड भरावा लागू शकतो...

अनेक बँकांमध्ये किमान शिल्लक 5000 आहे तर अनेक बँकांमध्ये 10,000 आहे. तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही यापेक्षा कमी शिल्लक ठेवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल, ज्याचा थेट तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो.

बँकेचा फॉर्म भरावा लागेल...

आरबीआयच्या (RBI) नुसार, तुम्ही तुमची अनावश्यक अकाउंट्स बंद करा, जेणेकरून तुम्हाला अशा त्रासाला सामोरं जावं लागणार नाही. बँक अकाउंट बंद करण्यासाठी, तुम्हाला डी-लिंक फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला बँकेच्या शाखेतून अकाउंट बंद करण्याचा फॉर्म मिळतो, तो भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर तुमचं अकाउंट बंद होतं.