मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. जर एसबीआय ग्राहकांनी हे निर्धारित वेळेत केले नाही तर त्यांना बँकिंग सेवा मिळणे कठीण होईल. सरकारने पॅन कार्डला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची मुदत 30 सप्टेंबर ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने आपल्या ग्राहकांना शक्य तितक्या लवकर पॅनला आधारशी जोडण्याचे आवाहन केले आहे.
>> सर्वप्रथम, आयकर वेबसाइटच्या मदतीने, तुमचे पॅन आधारशी जोडलेले आहे की नाही ते शोधा.
>> यासाठी आधी आयकर वेबसाइटवर जा.
>> आधार कार्डवर प्रविष्ट केल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
>> आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष नमूद असेल तर त्या स्क्वेअरवर टिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
>> यानंतर लिंक आधार वर क्लिक करा. तुमचे पॅन आधारशी जोडले जाईल.
एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर, 12-अंकी आधार क्रमांक आणि 10-अंकी पॅन क्रमांक प्रविष्ट करा. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुमचे पॅन आधारशी जोडले जाईल.
निष्क्रिय पॅन कार्ड पुन्हा कार्यान्वित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमच्या नोंदणीकृत मोबाईलमधून 12 अंकी पॅन टाकावा लागेल. यानंतर, स्पेस देऊन 10 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा मेसेज 567678 किंवा 56161 वर एसएमएस करा.