नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात केलीय. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय वित्तीय धोरण समितीने बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर रेपो दर ५.४० टक्के इतका झाला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के इतका करण्यात आलाय.
या कपातीचा लाभ बँका आपल्या ग्राहकांनी देतील. जेणेकरुन गृह, वाहन आदी कर्जे स्वस्त होतील व मासिक हप्ते कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. यासोबतच आता डिसेंबर 2019 पासून 24 तास NEFT चा वापर निधी ट्रान्सफर करण्यासाठी होणार आहे. दरम्यान, सध्या ही NEFT ची सेवा महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथा शनिवार सोडून कामकाजाच्या प्रत्येक दिवशी सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत उपलब्ध आहे.