Bank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा

बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. 

Updated: Nov 9, 2022, 06:04 PM IST
Bank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा title=

Bank Locker Charges: बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने (RBI) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकेत लॉकर (Bank Locker) घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवरून नियमात बदल करण्यात आले आहेत. बँक लॉकरमध्ये चोरीच्या अनेक घटना घडतात. पण त्यावर बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. जर तुम्ही बँक लॉकरमध्ये सोनं-चांदी किंवा मौल्यवान वस्तू ठेवल्या असतील, तर ही बातमी महत्त्वाची आहे. 

लॉकर सिस्टममध्ये पारदर्शकता येणार

चोरीच्या प्रकरणात बँका आपले हात वर करतात. तसेच त्याला बँक जबाबदार नसल्याचं वारंवार सांगतात. मात्र आता बँकांना तसं करता येणार नाही. आता लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू गहाळ झाल्यास संबंधित बँक ग्राहकाला लॉकरच्या भाड्याच्या 100 पट भरपाई द्यावी लागेल. तसेच रिकाम्या लॉकरची लिस्ट, लॉकरसाठीचा वेटिंग लिस्ट नंबर डिस्प्लेवर लावावा लागेल. यामुळे लॉकर सिस्टममध्ये पारदर्शकता येईल. लॉकररुममध्ये प्रवेश करताना व्यक्ती आणि बँक स्टाफ सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असेल. त्याबरोबर सीसीटीव्ही फुटेज 180 दिवस म्हणजेच 6 महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवावं लागेल. कारण चोरी किंवा इतर अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता येईल.

Toilet In Train: ट्रेनमध्ये टॉयलेट कसं आलं? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी

लॉकर चार्जेस घेण्याबाबत नियम

लॉकर अॅक्सेस केल्यानंतर बँकेला ई-मेल आणि एसएमएसवर अलर्ट दिला जाईल. फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयने हा नियम बनवला आहे. बँकांना लॉकरचे भाडे जास्तीत जास्त 3 वर्षांसाठी घेण्याचा अधिकार आहे. लॉकरचे भाडे 2000 रुपये असेल, तर  इतर देखभाल शुल्क वगळता 6000 रुपयांपेक्षा जास्त आकारू शकत नाही.