Ration Card : सणासुदीच्या काळात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारने सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. दरम्यान आजच्या (4 ऑक्टोबर) मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिका धारकांच्याफायद्याचा आणि त्यांची दिवाळी (Diwali) गोड करण्याचा एक महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांना केवळ 100 रुपयांमध्ये दिवाळीमध्ये लागणाऱ्या किराणा वस्तूंचे पॅकेज मिळणार आहे. याचा फायदा राज्यातील 7 कोटी कुटुंबांना मिळणार आहे.
यासंबंधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आमच्या मंत्रिमंडळाने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनिमित्त 1 लाख 62 हजार रेशनकार्ड धारकांना म्हणजेच 7 कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ 100 रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. असे असले तरी दिवाळी जवळ आलेली असताना याचे वितरण नेमके कसे केले जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वाचा : सोने खरेदीकरण्यापूर्वी लक्ष द्या! नवरात्रीमध्ये सोन्याच्या दरात झाली 'इतक्या' रूपयांनी वाढ
या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांनी दिवाळीसाठी उपयुक्त असणारा रवा, चणाडाळ, साखर व तेल याचे प्रत्येकी एक किलो पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.