कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?

ह फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी यादीतील शेवटचा फोटोसुद्धा पाहणार आहे. 

Updated: Oct 18, 2022, 12:25 PM IST
कोणी जुना अभिनेता नव्हे, हे आहेत देशातील प्रख्यात व्यावसायिक; ओळखलं का?  title=
ratan tata mukesh ambani anad mahindra how these indian tycoons looked back in the day

Viral Photos : अनेकदा आपल्या नजरेसमोर असे फोटो येतात, जे पाहताना डोकं चक्रावून जातं. त्यातही हे फोटो जुने असतील, तर त्यासोबच्या आठवणी ऐकताना आपण त्यात रममाण होऊन जातो. असेच काहीसे फोटो सोशल मीडियामुळं समोर आले आणि पाहणारे पाहतच राहिले. कारण, हे फोटो होते भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजकांचे. 

जागतिक अर्थकारणामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या धनाढ्य व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला तर तुम्ही अंबानी (Ambani), अदानी (Adani) अशी नावं घ्याल. याच यादीत एक असंही नाव येतं जे त्यांच्या अब्जोंच्या कमाईसोबतच दान करण्यासाठीही ओळखले जातात. 

समाजोपयोगी कामांमध्ये योगदान देणाऱ्या या व्यक्तीनं दानशूरपणामध्ये अदानींनाही मागे टाकलं आहे. हा व्हायरल होणारा फोटो पाहून तुम्हाला त्यांचं नाव लक्षात येतंय का? अहं... हा कुणा बॉलिवूड अभिनेत्याचा जुना फोटो नाही. तर हा फोटो आहे, The  Czar of the Indian IT Industry अशी ओळख असणाऱ्या अझिम प्रेमजी (Azim Premji) यांचा. 2019 मध्ये दर दिवशी 22 कोटी रुपये दान करत प्रेमजींनी संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या होत्या. 

अधिक वाचा : आधुनिक युगातील 'दानशूर'; धनाढ्य Gautam Adani यांना मागे टाकत कोण करतंय सर्वाधिक दान?

 

यापुढचा फोटो बहुधा तुम्हाला माहिती असावा, कारण त्याची बरीच चर्चा झाली होती. हा हॅडसम हंक, दुसरंतिसरं कुणी नसून हे खुद्द रतन टाटा (Ratan Tata) आहेत. JRD Tata यांनी त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा त्याग केल्यानंतर रतन टाटा यांनी आपल्या खांद्यावर टाटा उद्योग समुहाची धुरा घेतली. 

RATAN TATA YOUNG AGE PICS COLLECTION AND DETAILS ABOUT HIS JOURNEY | सूरत  ही नहीं सीरत से भी धनी हैं रतन टाटा | Hindi News,

अधिक वाचा : 'आमचं नात कायम...', रतन टाटा यांच्या आयुष्यातील 'तिचं' पहिल्यांदाच जाहिर वक्तव्य

या फोटोविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण यामध्ये अंबानी बंधू आणि त्यांचे वडील धीरुभाई अंबानी दिसत आहेत. (Mukesh Ambani with father and brother anil ambani)

$150 billion इतक्या संपत्तीसह आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या गौतम अदानी (Gautam Adani) यांचा हा जुना फोटो. विमातळांपासून बंदरांपर्यंत ते अगदी वीज उद्योगापर्यंत अदानी समुहाचं नाव आज बरंच पुढे गेलं आहे. 

हे आहेत कुमार मंगलम बिर्ला (Kumar mangalam birla). 1995 मध्ये त्यांनी आदित्य बिर्ला ग्रुपची धुरा सांभाळली ज्यावेळी कंपनीची एकूण कमाई $2 billion इतकी होती. पण, कुमार मंगलम यांनी जबाबदारीनं काम करत बघता बघता हा आकडा $40 billion वर पोहोचवला होता. 

हा फोटो आता तुम्ही ओळखून दाखवाच. पहिल्या फोटोनं तुमची जितकी कसोटी पाहिली तितकीच कसोटी हा फोटोसुद्धा पाहणार आहे. या व्यक्तीची सोशल मीडियावर वाहवा होत असते. या व्यक्तीच्या ट्विटकडे सगळेच नजरा लावून बसलेले असतात. प्रशंसनीय आणि साचेबद्ध विचारसरणीला शह देत कामगिरी करणाऱ्यांना उत्स्फूर्त दाद आणि बक्षीस देण्यासाठीही या व्यक्तीची ओळख. आतातरी नाव लक्षात येतंय का? 

हे आहेत देशातील नवउद्यमींना प्रोत्सान देणारे आनंद महिंद्रा (Anand Mahindra). हा फोटो 1972 सालचा असून, त्यावेळी ते अवघ्या 17 वर्षांचे होते. सोशल मीडियावर हा फोटो अनेकांनाच ओळखणं कठीण होऊन बसलं होतं.