Ratan Tata Awards List: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झाले. रतन टाटा यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. साधेपणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळं टाटांबद्दल जनमानसात एक आदरयुक्त भावना होती. त्यांच्या समाजकार्याची संपूर्ण जगाने दखल घेतली. रतन टाटा यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी भारतातील जनतेतून करण्यात येत होती. पण रतन टाटा यांना अनेक सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. टाटा यांना 2000 साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसंच, 2008 साली त्यांना दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने त्यांना 2023 साली उद्योग रत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतीयांनी मागणी केली होती. यासाठी देशभरात अभियान चालवले गेले. भारतरत्न फॉर रतन टाटा असे त्याचे नाव होते. मात्र, रतन टाटा यांनी चाहत्यांना आवाहन करुन अशा प्रकारची मागणी करु नका, असं म्हटलं होतं.
टाटांच्या नेतृत्वात भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्राला नवा आकार आला. टाटा समुहाचे नाव जगभरात उंचावले. 1991 ते 2012 पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा समूहाने अनेक यशाच्या पायऱ्या उंचावल्या. त्याचा फायदा भारताच्या आर्थिक स्थितीतलाही झाला. लाखो लोकांना रोजगार मिळाला.
वर्ष | पुरस्कार | पुरस्कार देणाऱ्या संस्था |
2000 | पद्मभूषण | भारत सरकार |
2004 | मेडल ऑफ द ओरिएंटल रिपब्लिक ऑफ उरुग्वे | लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स |
2008 | पद्म विभूषण | भारत सरकार |
2008 | ओनररी डॉक्टर ऑफ लॉ | यूनिवर्सिटी ऑफ कैंब्रिज |
2008 | ओनररी डॉक्टर ऑफ साइंस | आईआईटी, बॉम्बे |
2008 | ओनररी डॉक्टर ऑफ साइंस | आईआईटी खरगपुर |
2008 | ओनररी सिटिजन अवॉर्ड | सिंगापुर सरकार |
2016 | कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ओनर | फ्रांस सरकार |
2023 | ओनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया | किंग चार्ल्स III |
2023 | उद्योग रत्न | महाराष्ट्र सरकार |