रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश?

विद्यमान सरन्यायाधीशांनीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सरकारला सूचवण्याची आतापर्यंतची परंपरा आहे.

Updated: Sep 1, 2018, 09:23 PM IST
रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश? title=

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायायलाचे विद्यमान न्यायमूर्ती रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली. 

विद्यमान सरन्यायाधीशांनीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सरकारला सूचवण्याची आतापर्यंतची परंपरा आहे. सरन्यायाधीश विद्यमान न्यायमूर्तींपैकी सेवाज्येष्ठतेच्यादृष्टीने सर्वात वरीष्ठ न्यायमूर्तींची शिफारस या पदासाठी करतात.   

सरकारकडूनही सरन्यायाधीशांची शिफारस कुठलेही आढेवेढे न घेता स्वीकारण्याची पद्धत आहे. दीपक मिश्रा यांच्या सरन्यायाधीशपदाची मुदत पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्यांनी शिफारस केल्याप्रमाणे जस्टीस गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.