राज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा

मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आपल्या भाषणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला.

Updated: Aug 10, 2017, 04:05 PM IST
राज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा title=

 नवी दिल्ली : मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आपल्या भाषणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यसभेतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी भाषण केले. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या स्टाईलमध्ये कविता सादर केल्यात. आपल्या एकापेक्षा एक भारी कवितांनी सभागृहात राठवले यांनी धम्माल उडवून दिले. 

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आठवले यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी आठवले यांनी अन्सारींवरील एक कविता सादर केली. ती ऐकून सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर,  हमीद अन्सारींनाही हसू आवरले नाही.