राम रहीमची मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण

बलात्काराप्रकरणी दोषी असलेला गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण आली आहे.

Updated: Oct 3, 2017, 04:24 PM IST
राम रहीमची मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण  title=

नवी दिल्ली : बलात्काराप्रकरणी दोषी असलेला गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत पोलिसांना शरण आली आहे. पंचकुला पोलिसांना हनीप्रीत शरण आली आहे. बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम दोषी आढळल्यावर पंचकूलामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली होती. या हिंसाचाराप्रकरणी पोलीस हनीप्रीतच्या शोधात होते. हनीप्रीतविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनीप्रीतच्या शोधण्यासाठी पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर पोस्टरही लावले होते. हनीप्रीत नेपाळमध्ये गेल्याचा संशय पोलिसांना होता. शरण आल्यानंतर हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांना शरण जायच्या आधी हनीप्रीतनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मी खूप घाबरले होते, त्यावेळी माझी मानसिक स्थिती काय होती हे मी सांगू शकत नाही, असं हनीप्रीत म्हणाली आहे. राम रहीमच्या हेलिकॉप्टरमधून जाण्यावरही काही जणांनी आक्षेप घेतला, पण कोर्टाच्या परवानगीनं मी हेलिकॉप्टरमधून गेले, असं वक्तव्य हनीप्रीतनं केलं आहे.

या सगळ्या प्रकरणामध्ये मी निर्दोष आहे. माझी बाजू मी कोर्टात मांडेन. तसंच माझे आणि राम रहीम यांच्यामधलं नात पवित्र होतं, असं स्पष्टीकरण हनीप्रीतनं दिलं आहे. २६ ऑगस्टपासून हनीप्रीत बेपत्ता होती. तिच्या शोधासाठी पोलिसांनी नेपाळ, राजस्थान आणि मुंबईमध्ये छापेमारी केली आहे. अटकपूर्व जामिनासाठीही हनीप्रीतनं दिल्ली हायकोर्टात अर्ज केला होता, पण हा अर्ज फेटाळून लावण्यात आला.