Rakesh Jhunjhunwala यांचा 'गुंतवणूकीचा फॉर्म्युला' लीक; जाणून घ्या आणि व्हा गडगंज श्रीमंत

Rakesh Jhunjhunwala Portfolio : राकेश झुनझुनवाला यांची ही त्रिसूत्री तुम्हालाही दाखवेल श्रीमंतीचा मार्ग...

Updated: Aug 18, 2022, 01:06 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांचा 'गुंतवणूकीचा फॉर्म्युला' लीक; जाणून घ्या आणि व्हा गडगंज श्रीमंत title=

Rakesh Jhunjhunwala Portfolio : शेअर बाजारचे 'Big Bull' म्हणून ओळख असलेले दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा 14 ऑगस्टला अकाली मृत्यू झाला. अगदी 5 हजार रुपयांच्या गुंतवणूकीपासून राकेश झुनझुनवाला यांनी कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवला. त्यांनी निवडलेला शेअर हा नफा मिळवून देणारंच असा समज सामान्य माणसात निर्माण झाल्यामुळे राकेश झुनझुनवाला हे नाव सर्वसामान्यामध्ये खुप लोकप्रिय झालं.

शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी राकेश झुनझुनवाला शेअर निवडताना नेमकं काय विचार करुन निवड करत असतील? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. राकेश झुनझुनवालांच्या गुंतवणूकीचं सीक्रेट काय आहे? या प्रश्नावर एका इव्हेंटमध्ये राकेशजींनी उत्तर दिलं होतं. तुम्हालाही असाचं प्रश्न पडत असेल तर आज आम्ही राकेश झुनझुनवाला यांच गुंतवणूक सीक्रेट सांगणार आहोत.

तुम्हाला माहितीये राकेश झुनझुनवालांचा '3F' फॉर्म्यूला?

एका इव्हेंटमध्ये राकेश झुनझुनवाला यांचा त्यांच्या गुंतवणूकीचा सीक्रेट फॉर्म्यूल्याबद्दल विचारलं होतं तेव्हा त्यांनी या प्रश्नावर उत्तर देताना 'फेयर वैल्यू', 'फंडामेंटल' आणि 'फ्यूचर प्रॉस्पेक्ट' असं सांगितलं होतं.

जर शेअरची किंमत चांगली असेल किंवा स्वस्त व्हॅल्युएशनमध्ये शेअर मिळत असेल तर ते खूप चांगलं आहे. तसंच, कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असायला पाहिजे. याव्यतिरिक्त, कंपनीचा भविष्यातील प्लान काय आहे हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या कंपनीत हे तीनही घटक असतील तर तुमची गुंतवणूक बुडणार नाही.