राकेश झुनझुनवाला यांनी दिला '3F'चा फार्मुला; या सेक्टरमध्ये तेजीचे दिले संकेत

गुंतवणूकीच्या बाबतीत सिक्रेट मंत्र राकेश यांनी सांगितला आहे. जो नेहमी नफ्याकडे घेऊन जातो. 

Updated: May 28, 2021, 09:44 PM IST
राकेश झुनझुनवाला यांनी दिला '3F'चा फार्मुला; या सेक्टरमध्ये तेजीचे दिले संकेत title=
representative image

मुंबई : भारताचे वॉरेन बफे म्हणून राकेश झुनझुनवाला यांची ओळख आहे. परिस्थिती कोणतीही असो या बिग बुलने असे नियोजन केले आहे की, नुकसान जास्त होऊ नये आणि नफ्याचा पैसा कायम मिळत राहायला हवा. गुंतवणूकीच्या बाबतीत सिक्रेट मंत्र राकेश यांनी सांगितला आहे. जो नेहमी नफ्याकडे घेऊन जातो. 

शेअर बाजारावर विश्वास ठेवा

राकेश झुनझुनवाला यांनी भारतीय स्टॉक मार्केटच्या सध्याची चाल पाहता एक महत्वाची गोष्ट शेअर केली आहे. त्यांचं म्हणण आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देखील बाजाराने सामना केला आहे. या परिस्थितीती मोठी पडझड झाली नाही. अर्थव्यवस्थेची वास्तविकता नकारात्मक नाही. फक्त महामारीमुळे सेंटिमेंट निगेटीव्ह आहेत. जे कमी अवधीमध्ये थोडाफार परिणाम करू शकतात. कॉर्पोरेट इंडिया पूर्णतः ऑप्टीमिस्टिक आहे. मार्चच्या तिमाही निकालातही कंपन्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे.

3 F फॉर्मुला

एका न्युज चॅनेलच्या कार्यक्रमात राकेश झुनझुनवालाने गुंतवणूकदारांना सिक्रेट मंत्र सांगितला आहे. त्याचा वापर गुंतवणूकदारांनी केल्यास शक्यतो नफा होत राहिल. झुनझुनवालाने म्हटले की, मी 3F च्या सिद्धांतावर गुंतवणूक करीत असतो. 'फेअर व्हॅल्यू, फंडामेंटल आणि फ्यूचर प्रॉस्पेक्ट' शेअर्सची किंमत चांगली असो किंवा स्वस्त व्हॅल्यूएशनवर मिळत असेन तर उत्तम!  तसेच कंपनीचे फंडामेंटल उत्तम असायला हवे. कंपनीकडे हे तीन F असतील तर गुंतवणूकदाराला कधीही नुकसान होणार नाही.

या दोन सेक्टरवर लक्ष ठेवा

झुनझुनवाला यांच्या मते वर्ष 2021 भारतासाठी चांगले असेल. महामारीचा सर्वात मोठा हॉटेल इंडस्ट्री आणि एविएशनला बसला आहे. दोन्ही उद्योग सुस्त आहेत. परंतु येत्या काही दिवसांमध्ये दोन्ही सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येईल.