Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांनी मागे सोडला 32 शेअर्सचा 31,904 कोटींचा पोर्टफोलिओ, पाहा संपूर्ण यादी

 भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल, भारतातील वॉरेन बफे अशी ओळख असलेले देशातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर त्यांनी आपल्या वारासदारांसाठी त्यांचा मोठा पोर्टफोलिओ मागे सोडला आहे. एक नजर टाकुयात त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओवर. 

Updated: Aug 14, 2022, 02:52 PM IST
Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांनी मागे सोडला 32 शेअर्सचा 31,904 कोटींचा पोर्टफोलिओ, पाहा संपूर्ण यादी title=

Rakesh Jhunjhunwala Latest Portfolio: भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल, भारतातील वॉरेन बफे अशी ओळख असलेले देशातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर त्यांनी आपल्या वारासदारांसाठी त्यांचा मोठा पोर्टफोलिओ मागे सोडला आहे. एक नजर टाकुयात त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओवर. 

(Rakesh Jhunjhunwala Latest Portfolio) रविवारी सकाळी देशातील मोठे इनव्हेस्टर राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. अवघ्या पाच हजारांपासून सुरुवात करणारे झुनझुनवाला यांनी त्यांच्यामागे शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ सोडला आहे. अवघे पाच हजार ते तब्बल 46.18 हजार कोटी रुपयांपर्यंत झुनझुनवाला यांच्या पोटफोलिओची मजल गेल्याची माहिती आहे. 

राकेश झुनझुनवाला यांनी शेअर्स विकत घेतले किंवा विकल्यानंतर शेअर बाजारात मोठी हालचाल झाल्याचं आपण पाहिलंय. गेल्या तिमाहीती त्यांनी विविध कंपन्यांमधील त्यांची हिस्सेदारी वाढवली होती, काही शेअर्समधील हिस्सेदारी कमीही केलेली. काही नवीन कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूकही केली होती. त्यांच्या पोस्टफोलिओमध्ये सध्या 32 शेअर्स आहेत, ज्याची जून 2022 पर्यंतची फायलिंग आता समोर आली आहे. 

राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ पाहून अनेकजण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करतात. जाणून घेऊयात बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी मागील तिमाहीत कोणते शेअर्स विकत घेतले, म्हणजेच कुठे हिस्सेदारी वाढवली. कोणत्या कंपन्यांमधून त्यांनी हिस्सेदारी कमी केली. कोणत्या नव्या कंपन्यांवर विश्वास दाखवलेला? खरंतर राकेश झुनझुनवाला यांना नव्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला आवडायचं, असं जाणकार सांगतात. मात्र, नव्या कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करताना ते पूर्णपणे स्ट्रॅटेजीवर काम करून मगच त्यात गुंतवणूक करायचे.  

32 शेअर्सचा दमदार पोर्टफोलिओ

32 शेअर्स सोबत राकेश झुनझुनवाला यांची नेटवर्थ तब्बल 31,904.8 कोटी रुपयांची आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन (Titan ) , टाटा मोटर्स ( Tata motors ) , टाटा कम्युनिकेशन्स ( Tata Communications ) , नजारा टेक ( Nazara technologies ) , जुबीलंट फार्मा ( jubilant pharmova ), एस्कॉर्टस ( Escorts ) , इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स (Indiabulls Housing Finance ) यासारखेच अनेक शेअर्स आहेत. 






STOCK HOLDING VALUE (RS.) QTY HELD JUN 2022 CHANGE % JUN 2022 HOLDING %
Escorts Kubota Ltd. 307.8 Cr 18,30,388 NEW 1.40%
Anant Raj Ltd. 67.6 Cr 1,00,00,000 0% 3.40%
Agro Tech Foods Ltd. 156.5 Cr 20,03,259 0% 8.20%
Canara Bank 822.5 Cr 3,55,97,400 0% 2.00%
Crisil Ltd. 1,301.9 Cr 40,00,000 0% 5.50%
Edelweiss Financial Services Ltd. 86.4 Cr 1,51,25,000 0% 1.60%
Fortis Healthcare Ltd. 898.9 Cr 3,19,50,000 0% 4.20%
Indian Hotels Company Ltd. 816.3 Cr 3,00,16,965 0% 2.10%
Jubilant Pharmova Ltd. 377.2 Cr 1,07,70,000 0% 6.80%
Karur Vysya Bank Ltd. 229.9 Cr 3,59,83,516 0% 4.50%
Man Infraconstruction Ltd. 40.0 Cr 45,00,000 0% 1.20%
Orient Cement Ltd. 28.5 Cr 25,00,000 0% 1.20%
Prozone Intu Properties Ltd. 7.7 Cr 31,50,000 0% 2.10%
Rallis India Ltd. 428.8 Cr 1,90,68,320 0% 9.80%
Tata Communications Ltd. 336.6 Cr 30,75,687 0% 1.10%
Titan Company Ltd. 11,086.9 Cr 4,48,50,970 0% 5.10%
Va Tech Wabag Ltd. 124.2 Cr 50,00,000 0% 8.00%
Wockhardt Ltd. 71.0 Cr 30,00,005 0% 2.10%
Bilcare Ltd. 12.8 Cr 19,97,925 0% 8.50%
Dishman Carbogen Amcis Ltd. 57.3 Cr 50,00,000 0% 3.20%
Jubilant Ingrevia Ltd. 358.7 Cr 75,20,000 0% 4.70%
Metro Brands Ltd. 3,348.8 Cr 3,91,53,600 0% 14.40%
Aptech Ltd. 225.0 Cr 96,68,840 0.00% 23.40%
Federal Bank Ltd. 839.0 Cr 7,57,21,060 0.00% 3.60%
Geojit Financial Services Ltd. 84.8 Cr 1,80,37,500 0.00% 7.50%
Star Health and Allied Insurance Company Ltd. 7,017.5 Cr 10,07,53,935 0.00% 17.50%
Nazara Technologies Ltd. 423.5 Cr 65,88,620 -0.10% 10.00%
Tata Motors Ltd. 1,731.1 Cr 3,62,50,000 -0.10% 1.10%
Indiabulls Housing Finance Ltd. 68.6 Cr 55,00,000 -0.10% 1.20%
Autoline Industries Ltd. 13.1 Cr 17,51,233 -0.10% 4.50%
D B Realty Ltd. 30.8 Cr 50,00,000 -0.10% 1.90%
NCC Ltd. 505.2 Cr 7,83,33,266 -0.20% 12.60%
Delta Corp Ltd. - - Below 1% -
Indiabulls Real Estate Ltd. - - Below 1% -
National Aluminium Company Ltd. - - Below 1% -
TV18 Broadcast Ltd. - - Below 1% -

(Data Source: Trendlyne)

(वरील माहिती ही केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. यावरून आम्ही कोणत्याही प्रकारच्या खरेदी किंवा विक्रीचा सल्ला देत नाही. वरील लिस्टमध्ये केवळ असेच शेअर्स आहेत ज्यामध्ये झुनझुनवाला यांची हिस्सेदारी 1% किंवा त्यापेक्षा अधिक आहे.

Rakesh Jhunjhunwala Portfolio, rakesh jhunjhunwala net worth, rakesh jhunjhunwala portfolio list, rakesh jhunjhunwala death

rakesh jhunjhunwala death list of portfolio shares and net worth of rakesh jhunjhunwala indias big bull