राकेश झुनझुनवाला यांचे मोठे डील, नागरिकांसाठी देणार ही सुविधा

Akasa Air, backed by Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर मार्केटमधील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी मोठे डील केले आहे. आता त्यांनी थेट विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 

Updated: Oct 12, 2021, 08:10 AM IST
राकेश झुनझुनवाला यांचे मोठे डील, नागरिकांसाठी देणार ही सुविधा title=

मुंबई : Akasa Air, backed by Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर मार्केटमधील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी मोठे डील केले आहे. आता त्यांनी थेट विमान वाहतूक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. झुनझुनवाला यांनी 'आकाश एअरलाईन' ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीला आता मंजुरी मिळाली आहे. चार दिवसांपुर्वी झुनझुनवाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्या कंपनीला हवाई वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी दिली.

यामुळे देशात आता आणखी एक एअरलाईन सुरू होत आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एयरलाईन या कंपनीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. चार दिवसांपुर्वी राकेश झुनझुनवाला यांनी मोदी यांची भेट घेतली होती. आकाश एयरलाईन या कंपनीला नागरी उडड्न मंत्रालयाने काल मंजुरी दिली आहे. यानंतर राकेश झुनझुनवाला यांनी स्वस्त आणि आरामदायी प्रवास देणार असल्याचे म्हटले आहे.

याआधी उद्योगपती रतन टाटा यांच्या समूहातील टाटा सन्सने तोट्यातील एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी खरेदी केली. टाटा पुन्हा विमान सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे झुनझुनवाला यांनीही हवाई सेवेत पदार्पण केल्याने आता देशांत विमान सेवेत स्पर्धा दिसून येणार आहे.

शेअर बाजाराचे दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी आता विमानचालन क्षेत्रात आपले  स्थान प्रस्थापित करण्यासाठी हे एक मोठे पाऊल उचलले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा (Akasa) एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले आहे.

वास्तविक, SNV एसएनव्हीप्रायव्हेट लिमिटेड असे कंपनीचे नाव आहे आणि अकासा एअर त्याअंतर्गत विमान उड्डाण करेल. जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे हे या नवीन विमानसेवेचे सीईओ असतील. या कंपनीची विमान उड्डाणे 2022 च्या उन्हाळ्यापासून सुरू होतील. राकेश झुनझुनवाला यांची या विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. ही विमानसेवा सर्वात स्वस्त भाडे असेल, असे झुनझुनवाला यांनी स्पष्ट केले आहे.