Rajya Sabha : राज्यसभा निवडणूक निकाल जाहीर, पाहा कोण जिंकले आणि कोण हरले ?

Rajya Sabha Election Result 2022:  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. जाणून घ्या कोण जिंकले आणि कोण हरले? येथे संपूर्ण यादी पहा

Updated: Jun 11, 2022, 10:03 AM IST
 Rajya Sabha : राज्यसभा निवडणूक निकाल जाहीर, पाहा कोण जिंकले आणि कोण हरले ?  title=

नवी दिल्ली : Rajya Sabha Election Result 2022:  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. जाणून घ्या कोण जिंकले आणि कोण हरले? येथे संपूर्ण यादी पहा

राज्यसभा निवडणुकीच्या 16 जागांवर मतदान झाले आहे. या सर्व जागांचे निकाल लागले आहेत. (Rajya Sabha Election Result 2022) देशातील 4 राज्यांमधील 16 राज्यसभेच्या जागांवर शुक्रवारी मतदान झाले. या जागांवर झालेल्या मतमोजणीनंतर राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन आणि भाजपला एक जागा मिळाली. कर्नाटकात भाजपने तीन जागा जिंकल्या, तर काँग्रेसच्या खात्यात एकच जागा आली, तर महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतमोजणीत पेच निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर रात्री उशिरा मतमोजणीला सुरुवात झाली. राज्यसभा निवडणुकीत कोण जिंकले ते सांगू.

1. राजस्थान

उमेदवार

विजय / पराभूत

पक्ष

मुकुल वासनिक

विजयी

काँग्रेस

रणदीप सुरजेवाला

विजयी

काँग्रेस

प्रमोद तिवारी

विजयी

काँग्रेस

घनश्याम तिवारी

विजयी

भाजप

सुभाष चंद्रा

पराभूत

अपक्ष

 

 

2. कर्नाटक

उमेदवार

विजय / पराभूत

पक्ष

निर्मला सीतारमण

विजयी

भाजप

जग्गेश

विजयी

भाजप

लाहर सिंह

विजयी

भाजप

जयराम रमेश

विजयी

काँग्रेस

मन्सूर अली खान

पराभूत

काँग्रेस

डी कुपेंद्र रेड्डी

पराभूत

जेडी(एस)

 

3. महाराष्ट्र

उमेदवार

विजयी / पराभूत

पक्ष

पीयूष गोयल

विजयी

भाजप

अनिल बोंडे

विजयी

भाजप

धनंजय महाडिक

विजयी

भाजप

प्रफुल्ल पटेल

विजयी

एनसीपी

संजय राऊत

विजयी

शिवसेना

संयज पवार

पराभूत

शिवसेना

इमरान प्रतापगढ़ी

विजयी

काँग्रेस

 

4. हरियाणा

उमेदवार

विजयी / पराभूत

 पक्ष

कार्तिकेय शर्मा

विजयी

अपक्ष

कृष्ण लाल पवार

विजयी

भाजप

अजय माकन

पराभूत

काँग्रेस

राज्यसभेच्या 57 जागा रिक्त  

15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 57 जागा रिक्त होत्या. त्यापैकी 41 वर उमेदवार बिनविरोध निवडून आले. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमधील सर्व 41 उमेदवार गेल्या शुक्रवारी बिनविरोध निवडून आले.