Monsoon 2022 : पावसात फिरायचा Plan करताय? 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

सोलो आणि वन डे ट्रिप तर आपण नेहमी करत असतो. यावेळी जरा वेगळी मान्सून ट्रिप करण्याचा विचार असेल तर या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या. 

Updated: Jun 11, 2022, 09:10 AM IST
Monsoon 2022 : पावसात फिरायचा Plan करताय? 5 ठिकाणांना नक्की भेट द्या title=

मुंबई : मान्सून आला आहे. मान्सूनमध्ये ट्रिप तर झालीच पाहिजे. वाफाळता चहा-भजी आणि ट्रिप या गोष्टी तर प्रत्येक पावसाळ्यात ठरलेल्या असतात. सोलो आणि वन डे ट्रिप तर आपण नेहमी करत असतो. यावेळी जरा वेगळी मान्सून ट्रिप करण्याचा विचार असेल तर या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या. 

अरुणाचल प्रदेशात पावसातलं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी नक्की भेट द्यावी. हे निसर्गसौंदर्य पाहायचे असेल तर अरुणाचल प्रदेशातील मुख्य पर्यटन स्थळ तवांगला नक्की जा. बर्फाच्छादित शिखरं एक वेगळाच अनुभव देतात. सुंदर तलाव आणि धबधबे पाहून मन शांत आणि प्रसन्न होतं. निसर्गाचा हा अनमोल ठेवा पाहायला एकदातरी इथे नक्की भेट द्या. अरुणाचलमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे ५,६०० फूट उंचीवर असलेली झिरो व्हॅली जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. 

आसाममध्ये पावसाळ्यात प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. तुम्ही मुलांसह काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊ शकता. ब्रह्मपुत्रा नदीतील एक प्राचीन आणि प्रदूषणमुक्त गोड्या पाण्याचे बेट आहे जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

शिलाँग हे एक हिल स्टेशन आहे आणि मेघालयची राजधानी, शिलाँगला ढग आणि निसर्गांचं सौंदर्य अनुभवता येतं. स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या. पावसात इथे हिरवी चादर पसरल्याचा फिल येतो. चेरापुंजी हे देखील एक सुंदर ठिकाण फिरण्यासारखं आहे. तुरा, जोवई, डोकी या सुंदर टेकड्या आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता. 

महाराष्ट्रात भंडारदरा, आंबोली, महाबळेश्वर यासारखी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही उत्तम पिकनिकसाठी प्लॅन करू शकता.