नवी दिल्ली : अभिनेता सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधानांच्या स्वच्छता मोहिमेला पाठिंबा दिला आहे. 'स्वच्छता ही सेवा' असे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले. स्वच्छ भारत मिशनसाठी पंतप्रधान मोदींनी सिनेक्षेत्रातील अनेकांना या मोहिमेस पाठिंबा देण्याचे आवाहन केले. रजनीकांतने याला सपोर्ट केला आहे.
रजनीकांत दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. आपल्या स्टारडमवरती तो निवडणूक जिंकू शकतो एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर तामिळनाडूच्या राजकारणात भाजपाही स्वत:ला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आधीच सांगितले आहे की जर रजनीकांत राजकारणात येतात तर त्यांचा भाजपमध्ये स्वागत आहे.
I extend my full support to our hon. Prime Minister @narendramodi ji’s #SwachhataHiSeva mission. Cleanliness is godliness.
— Rajinikanth (@superstarrajini) September 22, 2017
मोदींनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली होती. ही मोहिम वाढवण्यासाठी त्यांनी अनेक दिग्गजांना यात सहभागी केले. मोदींनी पत्रात लिहिले की, महात्मा गांधी स्वच्छतेवर खूप जोर देत असत. आपली समाजाविषयीची आपली मनोवृत्ती कशी आहे हे आपण केलेली स्वच्छता पाहून कळते असे ते म्हणत.
राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात देशात 'स्वच्छता ही सेवा' अभियानाची सुरुवात केली जेणेकरून स्वच्छतेसाठी लोक पुन्हा एकदा प्रेरित होऊ शकतील.