घागरा घालून स्विमिंग पूलमध्ये गरबा, पाहा भन्नाट Video

सध्या सोशल मीडियावर गरबा खेळतानाचा एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.

Updated: Sep 24, 2022, 04:48 PM IST
घागरा घालून स्विमिंग पूलमध्ये गरबा, पाहा भन्नाट Video title=
Rajasthan Swimming Pool Garbh Video and Navratri Garba Viral on Social Media NM

Garbh Video 2022 : गणपतीनंतर (Ganapati) आता सगळ्यांना वेध लागले आहे ते नवरात्रीचे (Navratri 2022)...सोमवारी 26 सप्टेंबरपासून घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2022) करण्यात येणार आहे. नवरात्र म्हटलं की तरुण-तरुणींना विशेष आकर्षण असतं ते, गरब्याचं...गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये खेळण्यात येणारा गरब्याचे फंड आता भारतात सगळीकडे पाहिला मिळतात. 

कोरोनाच्या महासंकटानंतर यंदा दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे गरबाप्रेमींमध्ये (Garba lovers) उत्साह दिसून येतं आहे. ज्यांना गरबा खेळता येतं नाही, त्यांनी रितसर क्लास लावला आहे. 

सध्या सोशल मीडियावर गरबा खेळतानाचा एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आगळ्या वेगळ्या या गरब्याने सगळ्यांना आश्चर्य व्यक्त केला आहे. हा गरबा इतर गरब्यापेक्षा वेगळा आहे. (Rajasthan Swimming Pool Garbh Video and Navratri Garba Viral on Social Media NM)

तुम्ही स्विमिंग पूलमध्ये (swimming pool) वेगवेगळे गेम खेळताना पाहिले आहेत. पण कधी गरबा खेळताना पाहिला आहे का?, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणांचा समूह स्विमिंग पूलमध्ये गरबा (swimming pool Garba) खेळताना दिसतं आहे. 

पारंपरिक चनिया चोळी आणि केडीयू घालून तरुण-तरुणी दोघेही भन्नाट स्टेप करताना या व्हिडीओमध्ये दिसतं आहेत. स्विमिंग पूलमध्ये लोकांनी जबरदस्त गरबा करून सर्वांची मने जिंकली आहेत.  पाण्याखाली गरबा करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूरमधील (Udaipur) आहे.