Crime News Women Ran Away With Son In Law: तुम्ही यापूर्वी अनेकदा जगावेगळ्या प्रेम कथा ऐकल्या असतील, पाहिल्या असतील किंवा त्याबद्दल वाचलं असेल. सध्या राजस्थानमधून अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील सिरोहीमध्ये हा प्रकार घडला आहे. येथील एक महिला तिच्या जवयाबरोबर पळून गेली. या महिलेचं तिच्या जवयावर मन जडलं. दोघांमधील प्रेम आणि उत्कटता दिवसोंदिवस वाढू लागली. एकमेकांशिवाय आपण राहू शकत नाही असं या दोघांना वाटल्याने त्यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. प्रेमात पडलेल्या या सासू आणि जावयाने घरातून पळ काढल्याच समजल्यानंतर एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या परिसरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
समोर आलेल्या माहितीनुसार, जावयाच्या प्रेमात अखंड बुडालेली सासू 40 वर्षांची आहे. तर जावई 27 वर्षांचा आहे. 27 वर्षीय जावई वरचेवर सासरवाडीला यायचा. नित्याचं येणं-जाणं असल्याने त्याच्या सासूबरोबर बऱ्याच गप्पा व्हायच्या. याच गप्पांमधून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर हे दोघे तासन् तास एकमेकांशी फोनवरुन बोलू लागले. दोघांमधील प्रेम दिवसोंदिवस अधिक अधिक वाढत गेलं. त्यानंतर एक दिवस दोघांनी ठरवून घरातून पळ काढला. जावयाच्या प्रेमात पडलेली सासू त्याला घेऊन पळून गेल्याचं समोर आल्यानंतर दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. पळून गेलेल्या जावयाची सासरवाडी सियाकरा गावात असून या प्रकरणाचा गावकऱ्यांना धक्का बसला आहे.
राजस्थान आणि गुजरातच्या सीमेजवळ सिरोही जिल्ह्यामधील ही लव्ह स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण पंचक्रोषीमध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. विशेष म्हणजे प्राथमिक तपासामध्ये पळून जाण्यासाठी या दोघांनी मिळून कट रचल्याचंही समोर आलं आहे. घरी सासू आणि सासरे वगळता कोणीच नसताना जावई त्यांच्या घरी पोहोचला. सासऱ्याबरोबर मद्यप्राशन करण्याचं नाटक करुन जवयाने सासऱ्याला दारु पाजली. सासरा मद्यधुंदावस्थेत असतानाच हे दोघे पळून गेले. मात्र नंतर शुद्धीवर आलेला या महिलेचा पती त्याची पत्नी जवयाबरोबर पळून गेल्याचं समजल्यानंतर चांगलाच संतापला. या व्यक्तीने आता त्याची पत्नी आणि जावयाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन फरार जोडप्याचा शोध सुरु केला आहे. अनादरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. मात्र हा सारा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत.
मुलाच्या कुटुंबियांनी लेखी तक्रार दाखल केली नसली तरी त्यांचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे. आता हे दोघे नेमके कुठे आणि कोणाच्या मदतीने पळून गेले याचा पोलीस शोध घेत आहेत. घरातील इतर कोणाची या दोघांना फूस होती का याचाही तपास केला जात आहे.