Brahmakumaris Sanstha Rasoi: चमत्कारच म्हणा की..! गॅस शिवाय तयार होतं जेवण अन् हजारो लोकं मारतात ताव

Shiv Baba Ka Bhandara: होय... इथं स्वयंपाकासाठी अग्नीचा (Gas Cylinder) वापर केला जात नाही. सर्वात मोठ्या किचनमध्ये (Kitchen) बनवलेलं स्वयंपाकघर म्हणजेच 'शिव बाबांचा भंडारा'

Updated: Jan 7, 2023, 04:26 PM IST
Brahmakumaris Sanstha Rasoi:  चमत्कारच म्हणा की..! गॅस शिवाय तयार होतं जेवण अन् हजारो लोकं मारतात ताव title=

Brahmakumaris Sanstha Rasoi:  राजस्थानमध्ये असं एक स्वयंपाकघर... जे राजपूतांच्या (Rajput) अभिमानासाठी प्रसिद्ध आहे. एका इमारतीत 3 मजल्यांवर पसरलेल्या या स्वयंपाकघरात (kitchen) अवघ्या 2 तासात 25 ते 35 हजार लोकांचं जेवण तयार होतं. तुम्हालाही आश्चर्य वाटेल की फक्त 1 तासात 50 हजार चवदार रोट्या, झणझणीत पुरी आणि गरमागरम पराठे तयार केले जातात. त्यामुळे या स्वयंपाकघराची देशभऊर एकच चर्चा होताना दिसते. (rajasthan biggest brahmakumaris sanstha rasoi is pure where 2 lakh rotis made daily with dal rice and tea marathi news)

लांब आणि रुंद कॉरिडॉरमध्ये तुम्हाला डाळ भात (dal rice) देखील बनवला जातो. तसेच चहा (tea) आणि कॉफी (Coffee) देखील सहज उपलब्ध होतो. खास गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न शिजवलं जातं की तेही गॅसच्या स्टोव्हशिवाय (Stove), होय... इथं स्वयंपाकासाठी अग्नीचा (Gas Cylinder) वापर केला जात नाही.

राजस्थानच्या (Rajastan News) या सर्वात मोठ्या किचनमध्ये (Kitchen) बनवलेलं स्वयंपाकघर म्हणजेच 'शिव बाबांचा भंडारा'. हे स्वयंपाकघर राजस्थानमधील शांती वन कॉम्प्लेक्समध्ये आहे, जे राजस्थानच्या अबू रोड येथं आहे. याठिकाणी तब्बल 15 हजार लोकांची राहण्याची सोय उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे, 50 हजाराहून अधिक महिला याठिकाणी समर्पितपणे सेवा देत आहेत. या ठिकाणी 15 लाख नियमित अध्यात्मिक सेवा घेतलेले विद्यार्थी आहेत जे नियमितपणे राजयोगाचा अभ्यास करतात आणि संस्थेच्या सेवा केंद्रांना भेट देऊन सत्संग करतात.

आणखी वाचा - VIDEO : जिममध्ये व्यायाम करताना दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

इथं स्टीम मशीनमध्ये (steam machine) वाफेसह नाश्ता तयार केला जातो. त्याच्या जवळच्या वरच्या बाजूच्या चेंबरमध्ये भात आणि डाळ बनवली जाते. भाजीपाला धुणे, कापणे आणि तयार करणं यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. या किचनमध्ये 6 हजार लोकांचे जेवण फक्त 45 मिनिटांत सहज तयार होतं.

दरम्यान, एका दिवसात 3 टन वाफ तयार होते, त्याचा वापर जेवण बनवण्यासाठी आणि मशिनसाठी केला जातो. येथे 4 बॉयलर बसवले आहेत, जे 1 तासात 600 ते 800 किलो लिटर वाफ तयार करतात. उकळत्या पाण्याचा 500 अंश तापमानाच्या कॉइलच्या संपर्कात आल्यावर त्याचं वाफेत रूपांतर होतं. या दरम्यान, त्याचे तापमान 200 अंशांच्या आसपास राहतं. त्यामुळे स्वयंपाक जलद होण्यास मदत होते.