राजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा

राजस्थानच्या भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे बजेट विधानसभेत सादर करत आहेत. या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी 50 हजारापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 12, 2018, 01:32 PM IST
राजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा title=

जयपूर : राजस्थानच्या भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे बजेट विधानसभेत सादर करत आहेत. या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी 50 हजारापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. 

राजस्थानचं 2018-19 चं बजेट सादर करतांना सीएम वसुंधरा राजे यांनी सरकारचं यश देखील सांगितलं. बजेटमध्ये वसुंधरा राजे यांनी म्हटलं की, आम्ही सशक्त राजस्थान बनवण्याचा संकल्प केला आहे. यासाठी गुंतवणूक, बेरोजगारी, कौशल्य विकासवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. 

बाडमेर रिफायनरीचं उल्लेख करत त्यांनी म्हटलं की, हा प्रोजेक्ट राजस्थानचा चेहरा बदलेल. 1 लाख रोजगाराच्या नव्या संधी यातून निर्माण होतील. नव्या एमओयूने 40 हजार कोटी रुपयांची बचत होईल.