रेल्वे देशभरात बांधणार ५० रेल्वे स्थानके, एक लाख कोटींचा खर्च अपेक्षित

 येत्या काही वर्षांत देशात किमान ५० रेल्वे स्थानके उभारण्याची योजना आहे.

Updated: Sep 17, 2020, 09:32 PM IST
रेल्वे देशभरात बांधणार ५० रेल्वे स्थानके, एक लाख कोटींचा खर्च अपेक्षित title=

नवी दिल्ली : सरकार नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करणार आहे. यासाठी 4926 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून त्यांची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2020 आहे.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. अमिताभ कांत म्हणाले की, रेल्वे स्थानक विस्तारीकरणासाठी नगरविकास सचिव आणि वित्तीय व्यवहार सचिव यांची मोठी भूमिका निभावणार आहेत. देशातील रेल्वे स्थानकांच्या विस्तारासाठी बर्‍याच कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. अमिताभ कांत यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत देशात किमान ५० रेल्वे स्थानके उभारण्याची योजना आहे.

अमिताभ कांत म्हणाले की, देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी सरकार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते. दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त देशातील 8 स्थानकांचा सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलवर पुनर्विकास केला जाईल. दर्जेदार ट्रेन सेवा, नवीन तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित सेवा प्रवाशांना चांगला अनुभव देईल.

अमिताभ कांत म्हणाले की, देशातील 7 हजार स्थानकांपैकी केवळ 10-15 स्थानकांवर ही फी आकारली जाईल. ही फी इतकी असेल की प्रत्येकजण त्यास सहजपणे देऊ शकेल. स्थानके विकसित करण्यासाठी सरकार जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा स्थापित करण्याची तयारी करत आहे. या अनुषंगाने गांधीनगर आणि हबीबगंज स्थानक 2021 पर्यंत पूर्णपणे तयार होतील.

अमिताभ कांत म्हणाले की, देशात हे पहिल्यांदाच होत आहे. जिथे खासगी कंपन्या भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाने प्रवासी गाड्या चालवतील.