Confirm Train Ticket: भारतीय रेल्वे दररोज 10 हजाराहून अधिक पॅसेंजर ट्रेन चालवल्या जातात. ज्यात करोडो लोक प्रवास करतात. मात्र, भारतीय रेल्वेने कितीही ट्रेन चालवल्या तरीदेखील सणासुदीच्या दिवसांत आणि सुट्ट्यांच्या दिवसांत कन्फर्म तिकिट मिळवणे खूप कठिण होऊन जाते. अनेकदा तुम्हाला वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची वाट पाहत बसावी लागते. पण लवकरच आता ही वेटिंग तिकिटांची कटकट संपणार आहे. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सगळ्यांना ट्रेनचे कन्फर्म तिकिट मिळणार आहे. त्यासाठी आता वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची वाट पाहावी लागणार नाही.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये सीटची उपलब्धता आणि पुरवठा यातील अंतर पूर्ण करण्यासाठी रेल्वे सतत काम करत आहे. 2031-32 पर्यत ट्रेनमध्ये वेटिंग तिकिटाची समस्या संपून जाईल. ट्रेनमध्ये रिझर्व्ह सीटची मागणी आणि उपलब्धता यातील अंतर पूर्ण करण्यासाठी एक ध्येय ठरवण्यात आले आहे. त्यामुळं येत्या काही वर्षांत वेटिंग तिकिटांसाठी वाच पाहावी लागणार नाहीये. सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेसाठी सुपर अॅप बनवण्यात येणार आहे. ज्यात रेल्वेसंबंधीत सर्व सुविधांची माहिती देण्यात आली आहे. जसं की तुम्हाला पाहायचं असेल की कोणती ट्रेन कुठे जातेय, तिकिट खरेदी करायते असेल, रिझर्व्ह किंवा अनरिझर्व्ह असेल. रिझर्व्ह असेल तर आयआरसीटीसीचा वापर करा आणि अनरिझर्व्ह असेल तर रांगेत उभं राहावं लागणार नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून एक सुपर अॅल तयार करण्यात आलं आहे. त्यामुळं प्रवाशांना चांगला अनुभव घेता येणार आहे. हे अॅप तयार होण्यासाठी 4-5 महिने लागू शकतात.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका मुलाखतीत दहा वर्षात भारतील रेल्वेचा कसा कायापालट झाला याची माहिती दिली आहे. रेल्वे रुळांचे काम करण्याच्या प्रक्रियेत 2004 ते 2014च्या दरम्यान जवळपास 17,000 किमीपर्यंत रूळ बनवण्यात आले आहेत. 2014 ते 2024 पर्यंत 31,000 किलोमीटर पर्यंत नवीन ट्रॅक बनवण्यात आले. 2004 ते 2014पर्यंत म्हणजेच 10 वर्षांत जवळपास 5 हजार किमी रेल्वे रूळांचे विद्युतीकरण करण्यात आले. तर, मागील दहा वर्षात 44,000 किमीपर्यंत रेल्वे रूळांचे विद्युतीकरण झाले आहे.