नवी दिल्ली : अनेकदा रेल्वे रुळ न ओलांडण्याचे आवाहन केलं जातं. तरी देखील बरेच नागरिक रेल्वे रुळ ओलांडून जातात. काही ठिकाणी रेल्वे रुळाला फाटक नसल्याने नागरिकांना लक्षात येत नाही. अशावेळी अपघात होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. एक भीषण अपघाताचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता की दुचाकीस्वार रेल्वे रुळ क्रॉस करून जात आहे. मात्र अचानक तो आपली दुचाकी सोडून पळतो. तो खाली कोसळतो आणि त्याच्या पार्श्वभागाला चटके बसतात. तो तिथून पळ काढतो.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता की तरुण दुचाकी सोडून पळ काढणार तेवढ्यात भरधाव एक्स्प्रेस गाडी रेल्वे रुळावरून जाते. ही रेल्वेगाडी दुचाकीला धडक देते. त्या दुचाकीचा अक्षरश: चुराडा होतो.
दैव बलवत्तर आणि काही सेकंद आधी या तरुणाच्या हजरजबाबीपणामुळे त्याचा जीव वाचतो मात्र बाईकचं मोठं नुकसान होतं. हा व्हिडीओ कुठला आहे याची कोणतीही माहिती सध्या मिळू शकली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही युजर्स हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचा दावा करत आहेत. मात्र अजून हा व्हिडीओ कुठल्या भागातला आहे याची माहिती मिळू शकली नाही. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवरून जाणं टाळा. अत्यावश्यक असेल तेव्हा काळजी घ्या असं आवाहन देखील करण्यात येतं ते पाळा.
झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.