रेल्वे रुळावर अडकला ट्रक, समोरून आली भरधाव ट्रेन आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

रेल्वे क्रॉसिंगवर केवळ लोकल नागरिकांचीच दक्षता आवश्यक नाही, तर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

Updated: Jul 7, 2022, 03:51 PM IST
रेल्वे रुळावर अडकला ट्रक, समोरून आली भरधाव ट्रेन आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा title=

मुंबई : सोशल मीडीयावर आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला अश्चर्यचकीत करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो ट्रेंड होत आहे. आपण रेल्वे अपघाता संदर्भात अनेक व्हिडीओ पाहिले असतील, हा व्हिडीओ देखील त्यांपैकी एक आहे. हा अपघात रेल्वे क्रॉसिंगदरम्यान घडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही लक्षात येईल की, क्रॉसिंगवर थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.

रेल्वे क्रॉसिंगवर केवळ लोकल नागरिकांचीच दक्षता आवश्यक नाही, तर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

येथे रेल्वे क्रॉसिंगवर एक ट्रकचे अडकला आणि त्याच वेळेला समोरुन ट्रेन आली. या ट्रकला लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तसे झाले नाही, तेवढ्यात समोरुन ट्रेन आली आणि त्या ट्रकला जोरात धकली.

सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तो कुठे आहे आणि घटनास्थळी काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा ही घटना कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ही घडली असल्याचे समोर आले आहे. सिद्धेश्वर रेल्वे क्रॉसिंगवर एक ट्रक क्रॉसिंग ओलांडत असताना अचानक त्याचे चाक रुळाच्या मधोमध अडकला. हा ट्रक पुढे सरकत नसल्याचे पाहताच लोकांनी येऊन मदत केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी मिळून ट्रक बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण जेव्हा ट्रेन यायची वेळ झाली तेव्हा सगळ्यांना समजले की आता हा ट्रक बाहेर पडू शकणार नाही.

ट्रेन जवळ येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व लोक पळून गेले. ट्रेनच्या ड्रायव्हरला ही गोष्ट समजली असता, त्याने ट्रेनवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत उशीर झाला होता, ज्यामुळे रेल्वे ट्रकला आदळली. नशीबाने ट्रेनचा स्पीड कमी झाल्याने ट्रकचे जास्त नुकसान झाले नाही. तसेच यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.