शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद म्हणून भावना गवळी

शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि प्रतोद म्हणून भावना गवळी (Bhavana Gawli) यांना मान्यता देण्यात आलीय.

Updated: Jul 19, 2022, 11:40 PM IST
शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद म्हणून भावना गवळी title=

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि प्रतोद म्हणून भावना गवळी (Bhavana Gawli) यांना मान्यता देण्यात आलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speker Om Birla) यांनी ही मान्यता दिली.  (rahul shewale as shiv sena group leader and bhavna gawli as pratod lok sabha speaker om birla approved)

शिवसेनेच्या 12 खासदारांनी शेवाळे यांनी गवळी यांचं पत्र दिलं होतं. ते पत्र ओम बिर्ला यांनी स्वीकारलंय. त्यामुळे आता गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.

दिल्लीत आज (19 जुलै) दुपारी शिवसेनेच्या 12 खासदारांची ओम बिर्ला यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत ओम बिर्ला यांना हे पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीनंतर ओम बिर्लाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र बिर्ला यांनी ग्रीन सिग्नल दिला.

युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून असहकार्य

दरम्यान शिवसेना-भाजप युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून असहकार्य करण्यात आल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला. दिल्लीत लोकसभा अध्यक्ष यांच्याशी बैठक पार पडली. 

या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 12 खासदारांसह महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केला. तसेच युतीसाठी पंतप्रधान नरेंद मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोटही शेवाळे यांनी केला.