राहुल गांधींनी सोशल मीडियावर जाहीर केलं 'होळी' सरप्राईज

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी होळीच्या निमित्तानं आपल्या आजोळी अर्थात इटलीला जाणार आहेत. 

Updated: Mar 1, 2018, 08:52 PM IST
राहुल गांधींनी सोशल मीडियावर जाहीर केलं 'होळी' सरप्राईज  title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी होळीच्या निमित्तानं आपल्या आजोळी अर्थात इटलीला जाणार आहेत. 

आपल्या आजीला 'सरप्राईज' भेट देण्यासाठी आपण इटलीला जाणार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. 

यंदा राहुल गांधी आपल्या आजीसोबत - पाउलो मायनो यांच्यासोबत होळी साजरी करणार आहेत. 

राहुल यांनी गुरुवारी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देत 'माझी आजी ९३ वर्षांची आहे... ती खूपच प्रेमळ आहे. होळीच्या निमित्तानं मी तिला सरप्राईज देणार आहे. मी तिची गळाभेट घेण्यासाठी आतूर झालोय... तुम्हा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा' असं ट्विट केलंय.

राहुल याआधी गेल्या वर्षी जून महिन्यात सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी इटलीला आजीकडे गेले होते.