बंगळूर: कर्नाटकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने आतापासूनच आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी त्यांनी बंगळूरमध्ये इंदिरा कॅन्टीन सुरु केले आहे. या योजनेचे लॉन्चिंग काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी करतील.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतंत्रतादिनानिमित्त बोलताना सांगितले की, ''बुधवारपासून बंगळूरमध्ये इंदिरा कँटीन सुरु होणार असून जिथे प्रत्येक दिवशी शहरातील श्रमिक आणि गरीब प्रवासी जेवण घेतील.'' सुरुवातील कॅंटीनमध्ये ५ रुपयांमध्ये नाश्ता आणि १० रुपयांमध्ये दुपार आणि रात्रीचे जेवण मिळेल.
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, ''आम्ही या कॅन्टीनचा अभ्यास करून राज्यातील इतर शहरांमध्ये अशा पद्धतीचे कॅन्टीन सुरु करू. मुख्यमंत्र्यानी चालू आर्थिक वर्षांत सगळ्या १९८ वार्ड्समध्ये 'अम्मा' कॅन्टीन चालवण्यासाठी बजेट मंजूर केले आहे. त्यांनी सांगितले की, कर्नाटकात कोणीही अन्नावाचून राहू नये. हाच आमचा उद्देश आहे. राज्यात प्रत्येक महिन्यात दारिद्य रेषेखालील लोकांना 'अन्न भाग्य योजने'अंतर्गत ७ किलो तांदूळ मोफत दिले जातील. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवण नीट मिळेल."
फिल्ड मार्शल मानेकशॉ परेड ग्राउंडमध्ये सुमारे ८००० लोकांच्या उपस्थितीत सिद्धरामय्या यांनी सांगितले की, डाळीच्या (तूरडाळीच्या) सबसिडीच्या दरात घट करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, ''स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आणि गर्भवती स्त्रियांसाठी मातृपूर्ण योजना राबवण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर पासून याचा विस्तार राज्यातील सगळ्या अंगणवाडी केंद्रात केला जाईल. ज्यांची संख्या १२ लाख आहे.