नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्यावसायिक अनिल अंबानी यांच्यावर निशाणा साधलायं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानीच्या खिशात टाकल्याचा आरोप राहुल यांनी केलायं. संरक्षणमंत्र्यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
I would like to clearly tell the youth of the country that the Prime Minister of India is a corrupt man: Rahul Gandhi #RafaleDeal pic.twitter.com/6PMQOtYY3P
— ANI (@ANI) October 11, 2018
मी देशाचा चौकीदार असल्याचं पंतप्रधान म्हणाले होते पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी जे आश्वासन दिलं होतं त्यावर काहीच बोलत नाहीत. जर त्यांच्याकडे उत्तर नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केलीयं. आपली बाजू घेण्यासाठी द सॉल्ट कंपनीवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केलायं.