'चौकीदार चोर है'वर राहुल गांधींनी पुन्हा व्यक्त केला 'खेद'

सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी 'चौकीदार चोर है' हे शब्द घातल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खेद व्यक्त केला आहे.

Updated: Apr 29, 2019, 07:14 PM IST
'चौकीदार चोर है'वर राहुल गांधींनी पुन्हा व्यक्त केला 'खेद' title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी 'चौकीदार चोर है' हे शब्द घातल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खेद व्यक्त केला आहे. त्यांनी आज न्यायालयात नव्यानं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात गांधींनी खेद हा शब्द कंसात वापरला आहे. भाजप खासदार मिनाक्षी लेखी यांनी केलेल्या याचिकेवर गांधी यांनी २२ एप्रिल रोजी पहिलं प्रतिज्ञापत्र दिलं होतं. त्यातही खेद हाच शब्द वापरला होता. मात्र दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीत लेखी यांची बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी खेद म्हणजे माफी नसल्याचा आक्षेप घेतला होता. 

आता नव्यानं दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही गांधींनी हाच शब्द वापरला आहे. आपण प्रचाराच्या धामधुमीत तसं बोललो. न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला उद्देश नव्हता, याचा पुनरुच्चारही दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.