पुष्कर सिंह धमी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ; सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री

उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर  सिंह धामी यांनी शपथ घेतली आहे

Updated: Jul 4, 2021, 06:37 PM IST
पुष्कर सिंह धमी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ; सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री title=

देहराडून : उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर  सिंह धामी यांनी शपथ घेतली आहे. धामी उत्तराखंडचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल बेबीरानी मोर्य यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली आहे.

पुष्कर सिंह धामी यांच्यासह सतपाल महाराज, हरक सिंह रावत, बंशीधर भगत, यशपाल आर्य, बिशन सिंह, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, गणेश जोशी, धनसिंह रावत, रेखा आर्य, यतीश्र्वरानंद यांनी शपथ घेतली.

पुष्कर यांनी घेतला वरिष्ठांचा आशिर्वाद
पुष्कर सिंह धामी यांनी शपथ घेण्याआधी बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. धामीने देहराडूनमध्ये राज्यमंत्री सतपाल महाराज यांची भेट घेतली. याशिवाय माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खंडूरी यांचीही भेट घेतली.