EPFO लवकरच खुशखबर देणार! नोकरदारांना फायदा होणार

कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO)EPF कायद्याअंतगर्त सध्याचं वेज सिलिंग वाढवण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाला पाठवला आहे. 

Updated: Jul 17, 2018, 06:57 PM IST
EPFO लवकरच खुशखबर देणार! नोकरदारांना फायदा होणार title=

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO)EPF कायद्याअंतगर्त सध्याचं वेज सिलिंग वाढवण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाला पाठवला आहे. वेज लिमिट वाढवण्याचा हा प्रस्ताव काही बदलांसह कामगार मंत्रालयात पाठवण्यात येईल, अशी माहिती झी बिजनेसला सूत्रांनी दिली आहे.  वेज लिमिट १५ हजारांवरून २१ हजार रुपये करण्याचा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव पास झाला तर त्याचा फायदा ५ कोटी सदस्यांना मिळणार आहे.

लवकरच मिळणार मंजुरी

या बदलांबद्दल वित्त मंत्रालय संतुष्ट आहे आणि लवकरच याला मंजुरी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव पुन्हा एकदा सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT)कडे पाठवण्यात येणार आहे. वेज लिमिट २१ हजार झालं तर ईपीएफओच्या सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल. ईपीएफओच्या कक्षेमध्ये पहिल्यापेक्षा जास्त लोकं येतील.

पेंशनवर पडणार प्रभाव

वेज लिमिट वाढवण्याचा सरळ प्रभाव कर्मचाऱ्यांच्या पेंशनवर पडणार आहे. यामुळे एमप्लॉई पेंशन स्कीम(ईपीएस)मध्ये सरकारचा हिस्सा वाढणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पास झाला तर पेंशनच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. १५ हजार रुपयांच्या वेज सीलिंगवर मेंबरच्या पेंशन खात्यामध्ये जास्तीत जास्त १२५० रुपये टाकले जातात.